टॉप न्यूज

VIDEO : चीनमध्ये मृत्यूचे भयानक तांडव

चीनमध्ये मृत्यूचे भयानक तांडव सुरू आहे. हृदय पिळवटून टाकणारा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. (Horrible Outbreak of Covid Deaths in China) त्यात स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. अंत्यसंस्कारासाठी तासनतास वेटिंग करावे लागत आहे. रूग्णालयात बेड नाही, अशी भयंकर अराजकतेची स्थिती आहे. हा व्हिडीओ मन हेलावून टाकणारा आहे.

कोरोनाच्या नव्या लाटेशी लढा देत असलेल्या चीनमधील हे वास्तव डॉ. एरिक डिंग यांनी समोर आणले आहे. ट्विटर प्रोफाईलमधील दाव्यानुसार, डॉ. डिंग हे हॉर्वर्ड विद्यापीठात गेली 16 वर्षे एपिडेमियोलॉजिस्ट आणि हेल्थ इकॉनॉमीस्ट म्हणजे महामारी तज्ञ आणि आरोग्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ट्विटरवर शेयर केलेला चीनमधील एका स्मशानभूमीचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. चीनमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे. चीन सरकारच्या सर्व दाव्यांची पोल खोलणारा हा व्हिडिओ आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये अजूनही लांबच लांब रांगा असल्याचा डॉ. डिंग यांचा दावा आहे.

या व्हिडिओमध्ये स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा दिसत आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी पोहोचलेले नातेवाईक मृतदेहासह खोळंबून आहेत. त्यांना तासनतास वाट पाहावी लागत आहे. डॉ. डिंग यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की “स्मशानभूमीबाहेर कधी नव्हे इतक्या लांबच लांब रांगा आहेत. आपल्या प्रियजनांच्या अंतिम संस्कारासाठी तासनतास वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ अनेकांवर आली आहे. आपल्या प्रियजनांच्या मृतदेहांसोबत असे तासनतास स्मशानभूमीबाहेर ताटकळत उभे राहणे किती वेदनादायक आहे. चीनमधील भीषण कोविड लाटेतील दुर्दैवी लोकांबाबत सहानुभूती बाळगूया.”

बीजिंग स्टेट मीडिया या सरकारी माध्यमातील कर्मचाऱ्यांनी यापुढे टीव्ही शो चालवू शकत नाही, असे सांगितले आहे. कारण अर्ध्याहून अधिक कर्मचारी आजारी आहेत. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांनी गेल्या दोन दिवसांत हेबेई प्रांतातील बाओडिंग आणि लांगफांग या शहरांमध्ये पाच रुग्णालये आणि दोन स्मशानभूमींना भेट दिली. सरकारने कोविडशी संबंधित निर्बंध शिथिल केल्यानंतर या भागात महामारीने उग्र रूप धारण केले. अनेक दिवस घरात कैद राहिलेले नागरिक आता आता बाहेर पडले आहेत, अनेक जण आपल्या कामावर परतत आहेत. मात्र, साथ अजून आटोक्यात आलेली नसल्याने यामुळे समस्या वाढत आहेत.

हे सुद्धा वाचा : 

ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 

पंतप्रधान मोदी यांचे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार; पुढचे 40 दिवस धोक्याचे, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

चीनमध्ये स्थिती अत्यंत बिकट आहे. चीनची राजधानी बीजिंगच्या नैऋत्येस सुमारे 70 किलोमीटरवर असलेल्या औद्योगिक हेबेई प्रांतातील काउंटी हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना त्वरित उपचारांची गरज आहे. मात्र, आजूबाजूची सर्व रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत. चीनमधील अनेक नागरिक असहाय्य आणि आगतिक आहेत. अनेक स्थानिक रुग्णालयात स्कॅनिंग, फुफ्फुसातील न्यूमोनिया सारखी लक्षणे तसेच कोविडच्या गंभीर प्रकरणांवर उपचार करण्यासाठीची व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. चीनमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर कोविड महामारीची लाट दिसून येत आहे. लहान शहरे आणि नैऋत्य बीजिंगमधील रुग्णालयांचे आपत्कालीन विभाग (आयसीयू) रुग्णांनी खच्चून भरलेले आहेत. रुग्णवाहिकेचेच आपत्कालीन कक्षात रुपांतर करून उपचार केले जात आहेत. अनेक वैद्यकीय कर्मचारी रूग्णालयात रिकाम्या खाटा मिळाव्यात म्हणून घरोघरी भटकत आहेत. खाटांचा तुटवडा असल्याने रूग्णांवर रूग्णालयांच्या कॉरिडॉरमध्ये आणि जमिनीवरच उपचार होत असल्याची परिस्थिती आहे.

Horrible Outbreak of Covid Deaths in China, A Heart Wrenching Shocking Video, No Beds in Hospitals

विक्रांत पाटील

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

5 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

5 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

5 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

5 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

6 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

7 hours ago