आरोग्य

नाशिक मनपा अक्शन मोडवर २४७ रुग्णालयाचे नळ आणि पाणी पुरवठा तोडणार

महापालिका अग्निशमन विभागाने नोटिसा बजाऊनही शहरातील २४७ रुग्णालयांनी फायर आॅडिटकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता अग्निशमन विभाग फायर आॅडिट करण्यास नकारघंटा देणार्‍या रुग्णालयांचे नळ व वीज कनेक्शन तोडणार आहे. तसेच तरी देखील सहकार्य करणे टाळल्यास रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याचा पर्यायावर देखील विचार करु शकते.राज्यात मागील काही वर्षात रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवीत हानी झाली आहे.त्यामुळे खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले. महापालिकेकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात फायर ऑडिट करून घेण्याची नोटीस बजावली जाते. या वर्षीदेखील शहरातील ६२२ रुग्णालयांना अग्निप्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत आहे की नाही, याचा दाखला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.(Nashik Municipal Corporation to cut taps and water supply of 247 hospitals on action mode)

मागील १८ फेब्रुवारीला अहवाल सादर करण्याची डेडलाईन देण्यात आली होती. शहरातील ६२२ पैकी त्यापैकी ३७५ रुग्णालयांनी फायर आॅडिट अहवाल सादर केला. तर २४७ रुग्णालयांनी हा अहवाल सादर करणे टाळले आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा मोठा हलगर्जीपणा आहे. अग्निशमन विभागाने या रुग्णालयांना अहवाल सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची नोटिस बजावली. परंतू तरी देखील रुग्णालयांनी अहवाल सादर केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अग्निशमन विभाग फायर आॅडिटकडे पाठ फिरवणार्‍या रुग्णालयांचे नळ व वीज कनेक्शन तोडणार आहे.

शहरातील ६२२ पैकी त्यापैकी ३७५ रुग्णालयांनी फायर आॅडिट अहवाल सादर केला. तर २४७ रुग्णालयांनी हा अहवाल सादर करणे टाळले आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा मोठा हलगर्जीपणा आहे. अग्निशमन विभागाने या रुग्णालयांना अहवाल सादर करण्यासाठी पंधरा दिवसांची नोटिस बजावली. परंतू तरी देखील रुग्णालयांनी अहवाल सादर केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अग्निशमन विभाग फायर आॅडिटकडे पाठ फिरवणार्‍या रुग्णालयांचे नळ व वीज कनेक्शन तोडणार आहे.

शहरातील ज्या रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसेल त्यांनी पुढिल पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून रुग्णालयांचे वीज व नळ कनेक्शन तोडले जाईल.

प्रतिक्रिया
शहरातील ज्या रुग्णालयांनी फायर आॅडिट केले नसेल त्यांनी पुढिल पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करावा. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून रुग्णालयांचे वीज व नळ कनेक्शन तोडले जाईल.
– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनपा

टीम लय भारी

Recent Posts

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

3 hours ago

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…

4 hours ago

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

6 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

9 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

9 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

9 hours ago