मनोरंजन

एल्विश यादवला कोर्टाने दिला दिलासा, पण तुरुंगातून नाही होणार सुटका, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?

एल्विश यादव यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रसिद्ध YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष मागितल्याप्रकरणी 17 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याला कोर्टातून जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. (Elvish Yadav Gets Bail in Snake Venom Case From Noida Court) मात्र, जामीन मिळाल्यानंतरही तो एल्विश म्हणजेच 22 मार्च रोजी तुरुंगातून बाहेर येणार नाही. याचे कारण त्याला अद्याप गुरुग्राम न्यायालयात हजर व्हायचे आहे. नोएडा तुरुंग प्रशासन त्याला 23 मार्च रोजी गुरुग्राम न्यायालयात हजर करणार आहे.

उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

गुरुग्राम पोलिसांनी एल्विशच्या प्रॉडक्शन वॉरंटसाठी नोएडा कोर्टात अर्ज केला होता, तो कोर्टाने मंजूर केला. त्याच्यावर गुरुग्रामच्या सेक्टर 53 मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनीएल्विशला अटक केल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी त्याची चौकशी करण्यासाठी प्रोडक्शन वॉरंट लागू केले होते.न्यायालयाने गुरुग्राम पोलिसांना प्रोडक्शन वॉरंट अंतर्गत चौकशीसाठी परवानगी दिली होती. आता नोएडा तुरुंग प्रशासन एल्विसला उद्या गुरुग्राम न्यायालयात हजर करणार आहे.

एल्विश यादवला अटकेनंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एल्विशच्या पहिल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही,अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर वकिलाने दुसरी याचिका दाखल केली. आता एल्विशला जामीन मिळाला आहे. ही बातमी मिळाल्यानंतर एल्विशचे चाहते चांगलेच खूश आहेत. एल्विश यादव सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे.

आरोग्य मंत्रालयाने सिद्धू मुसेवालाच्या आईला पाठवले नोटीस, IVFच्या मदतीने दिला बाळाला जन्म

मिळालेल्या माहितीअनुसार, एल्विश यादवला एनडीपीएसच्या कनिष्ठ न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे. रविवारपासून तो लुक्सर तुरुंगात बंद होता. आता त्याला जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.  तुरुंगात ५ दिवस घालवल्यानंतर आता एल्विश यादव आपल्या घरी परतणार आहे. एल्विशला कोर्टाकडून 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. वास्तविक, एल्विशवर रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याचा आरोप आहे. काही काळापूर्वी नोएडा पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने सापाचे विष पुरवल्याची कबुली दिली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत झळकणार सचिन पिळगावकर

नुकतेच एल्विश यादवच्या पालकांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. दरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाच्या नावामुळे एनजीओचे लोक जाणूनबुजून त्याला अडकवत आहेत. आमचा मुलगा निर्दोष आहे, त्याने असे काहीही केलेले नाही. त्याचवेळी आरोप मान्य करण्याबाबत एल्विशच्या वडिलांनी सांगितले की, असे काहीही घडले नाही, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. जेव्हा नोएडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. वडिलांनी इतरही अनेक खुलासे केले होते. ज्यामध्ये एल्विशकडे कोणतीही आलिशान कार नसल्याचे म्हटले होते. तो भाड्याने व्हिडिओ बनवतो.

काजल चोपडे

Recent Posts

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

5 mins ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

32 mins ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

59 mins ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

1 hour ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

3 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

4 hours ago