आरोग्य

चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात; हे करा घरगुती उपाय अन् मिळवा तजेलदार त्वचा

आपला चेहरा हा तजेलदार, पिंपल्स फ्री, सुरुकुत्या नसलेला असावा असं प्रत्येकालाच (Skin Care)वाटत असतं. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळू हळू उद्भवयाला सुरुवात होते. सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला महागडे ब्युटी ट्रीटमेंट घेतात, काही वेळा त्याचे त्वचेवर दुष्परिणामही होतात. सुरकुत्या घालवण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात पण त्याचा अधिक परिणाम होत नाही. त्यामुळे यावर घरगुती उपाय (Home Remedies)करणं कधीही चांगलं. जाणून घेऊयात घरगुती उपाय. (Skin Care tips Home Remedies for wrinkles on the face)

बदाम खा

बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि तुमची त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागते. पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवून सकाळी ते खा. यामुळे तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल. सलग सहा महिने नियमित बदामाचे सेवन करा आणि आपल्या चेहऱ्यामधील बदल स्वतःच अनुभवा.

केळ खा

केळ्यामध्ये जीवनसत्त्वे ए आणि सी असतात, जे निरोगी, तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी आवश्यक असतात. व्हिटॅमिन ए बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यात मदत करू शकते, तर व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत करू शकते. त्यामुळे, जर तुम्हाला त्या सुरकुत्या दूर ठेवायच्या असतील, तर रोज फक्त केळी खाणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

तुमची पण त्वचा तेलकट आहे? मग होळीच्या दिवशी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि चेहऱ्याची काळजी घ्या

गुलाबपाणी

गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरिनमुळे तुमची त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार होते. गुलाबपाण्यामुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे देखील कमी होण्यास मदत होते. त्वचेला तजेला आल्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि तुम्ही तरूण दिसू लागता.

जायफळ

जायफळ पावडर अॅंटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक संयुगे समृद्ध आहे.हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.डार्क स्पॉट्सच्या उपचारासाठी तुम्ही जायफळचा वापर करु शकता.

मधात एक नैसर्गिक स्वीटनर अमधसते ते माईश्चराईजरचे काम करते. मधामुळे फक्त सुरकुत्या दूर होतात असे नाही तर त्यातील अॅंटीऑक्सीडेंटमुळे त्वचाही हेल्दी राहते.

पीरियड्समध्ये सुरक्षित होळी खेळण्यासाठी आहे? मग आजच फॉलो करा ‘या’ टिप्स

नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरते. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्वचाला मऊपणा मिळतो ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

धनश्री ओतारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

3 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

3 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

5 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

7 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

8 hours ago