30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यतुमची पण त्वचा तेलकट आहे? मग होळीच्या दिवशी 'या' टिप्स फॉलो करा...

तुमची पण त्वचा तेलकट आहे? मग होळीच्या दिवशी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि चेहऱ्याची काळजी घ्या

आज आणि उद्या म्हणजे 24 आणि 25 मार्चला होळीचा (Holi 2024) सण साजरा केला जाणार आहे. होळी सर्वजण धूमधडाक्यात साजरा करतात. पण हा सण साजरा करतांना आपण आपल्या आरोग्याची आणि त्वचेची (Holi 2024 Oily Skin Care Tips) काळजी घेणेही आवश्यकय आहे. आजकाल बाजारात रसायनाने भरलेले रंग विकले जातात. त्या रंगानी होळी खेळण्यास आपल्या आरोग्य आणि त्वचेवर परिणाम होऊ शकतो.  त्यामुळे आपल्या त्वचेचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. (Holi 2024 Oily Skin Care Tips)

आज आणि उद्या म्हणजे 24 आणि 25 मार्चला होळीचा (Holi 2024) सण साजरा केला जाणार आहे. होळी सर्वजण धूमधडाक्यात साजरा करतात. पण हा सण साजरा करतांना आपण आपल्या आरोग्याची आणि त्वचेची (Holi 2024 Oily Skin Care Tips) काळजी घेणेही आवश्यकय आहे. आजकाल बाजारात रसायनाने भरलेले रंग विकले जातात. त्या रंगानी होळी खेळण्यास आपल्या आरोग्य आणि त्वचेवर परिणाम होऊ शकतो.  त्यामुळे आपल्या त्वचेचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. (Holi 2024 Oily Skin Care Tips)

होळीला रंगापासून केसांचे संरक्षण करायचे आहे? मग नक्की करा ‘या’ 4 तेलांचा वापर  

तेलकट त्वचा (Holi 2024 Oily Skin Care Tips) असलेल्या लोकांची सर्वात मोठी समस्या ही आहे की थोड्याशा निष्काळजीपणामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. अशा परिस्थितीत रंग न खेळता होळीच्या सणाचा आनंद कसा लुटता येईल. पण तेलकट त्वचेवर केमिकलवर आधारित रंग लावल्यास मुरुम येण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीतआम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी काही खास टिप्स…

तुम्हाला माहितीच असेल की, तेलकट त्वचेला जर रंग चिकटला तर तो त्वचेच्या छिद्रांमध्ये जातो आणि त्यामुळे त्वचेला नुकसान आणि मुरुम येण्याची शक्यता वाढते, म्हणूनच जेव्हा तुम्ही होळीच्या रंगांशी खेळत असाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे छिद्र उघडे नसावे.

होळीनंतर भिंतीवरील डाग काढायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

1. चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुम्ही काकडी आणि गुलाबपाणीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकता, यामुळे चेहरा साफ केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात.

2. लक्षात ठेवा की सनस्क्रीनशिवाय उन्हात जाऊ नये. सनस्क्रीन हे त्वचेसाठी संरक्षणात्मक कवचही आहे. यामुळे रंगात मिसळलेले रसायन तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये जाण्याची शक्यता कमी होते.

3. याशिवाय तुम्ही मेकअप करत असाल तर वॉटरप्रूफ मेकअप वापरा, ते तुमच्या त्वचेवर संरक्षणात्मक कवच सारखे काम करते. फक्त चांगल्या दर्जाची मेकअप उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करा.

कलिंगडचा गरच नव्हे तर बीया अन् सालीही आहेत फायद्याच्या

होळीनंतर अशी घ्या आपल्या त्वचेची
1. होळीचे रंग खेळल्यानंतर चुकूनही चेहऱ्यावर स्टीम घेऊ नयेत. असे केल्याने त्वचेवर चिकटलेले रंग रसायनांसह त्वचेत शिरतात. त्यामुळे पिंपल्स दिसण्याची शक्यता वाढते. होय, तुम्ही नक्कीच हलका फेशियल मसाज करू शकता.

2. जर तुम्ही होळीच्या पार्टीला गेला असाल आणि सूर्यप्रकाशामुळे तुमची त्वचा खूप टॅन होत असेल, तर तुम्ही कॉफी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा, असे केल्याने डेड स्किन निघून जाते आणि टॅनिंगही कमी होते.

3. रंगांशी खेळून तुमची त्वचा खराब झाली असेल, तर तुम्ही नारळाच्या पाण्याने चेहऱ्याला मसाज करा आणि काही वेळ तसाच राहू द्या, असे केल्याने तुमची त्वचा चमकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी