आरोग्य

महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा

राज्यात कुष्ठरोग (leprosy) मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. मात्र, सर्व पातळीवर उपाय योजना करून 2027 पर्यंत राज्य कुष्ठरोग मुक्त करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मंगळवारी (दि.28) रोजी केली. कुष्ठरोग निर्मुलनासाठी सचिव पातळीवर समिती बनवण्यात येणार असून या समितीत विकास आमटे (Vikas Amte), प्रकाश आमटे (Prakash Amte) यांना घेण्यात येणार आहे. आमदार राज्यात कुष्ठरोग पसारतोय. कुष्ठरोग बरा झालेल्या रुग्णां कोणतेच काम मिळत नाही. त्यांना सामावून घेतले जात नाही. अशा कुष्ठरोगातून बरे झालेल्यांसाठी पुनर्वसनाची काही योजना आहे का, असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) विचारला होता. त्यावर चर्चेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिले. (Tanaji Sawant’s announcement; Maharashtra state to make leprosy free)

कुष्ठरोगाचे रुग्ण बरे होतात, पण त्यांना कुठेच काम धंदा मिळत नाही. त्यांच्याकडून कोणी भाजी विकत घेत नाही. या बरे झालेल्या कुष्ठरोगीना अपंगाच प्रमाणपत्र देण्यात यावे, त्या आधारावर त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. मात्र, त्यांना 5 टक्केचं प्रमाणपत्र मिळत नाही. यामुळे त्यांना अडचण होत आहे. मात्र, राज्य सरकार त्यांना 5 टक्केच प्रमाणपत्र देईल. कोरोनामुळे त्यांचां सर्व्हे करायचा राहीला होता. मात्र, गेल्या काही दिवसात सर्व्हेचे काम झाले आहे. सात हजार लोकांची टीम बनवण्यात आली होती. त्या द्वारे 8 कोटी 66 लाख लोकांचा सर्व्ह करण्यात आला. यावेळी 3 लाख 67 हजार 77 संशयीत रुग्ण आढळून आले असून हे गंभीर असल्याचं तानाजी सावंत यावेळी म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी कुष्ठरोगी व्यक्तीला दर महिन्याला एक हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी केली.

हे सुद्धा वाचा
कर्तव्यतत्पर आमदार मातेच्या तक्रारीची खुद्द आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल!

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

TAIT Exam : विवाहित महिला उमेदवाराला परीक्षेपासून ठेवले वंचित; राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

कुष्ठरोग बरा झालेल्या लोकांच्या अनेक समस्या आहे. त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र मिळाले तरी नोकरी मिळतेच अस नाही, त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांचा सन्मानाचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्नावर राज्य सरकार तर्फे समिती बनवण्यात येणार आहे. समितीत अनेक मान्यवर असतील. ते आपले मत, विचार मांडतील आणि त्या नुसार उपाय योजना केल्या जातील. पसरत चाललेल्या कुष्ठरोगाचे निर्मूलन करू, असा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.

 

प्रदीप माळी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

14 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

15 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

15 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

15 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

18 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

18 hours ago