30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरराजकीयउद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले'तील असरानीसारखी

उद्धव ठाकरेंची अवस्था ‘शोले’तील असरानीसारखी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ‘मोगॅम्बो’ असा केलेला उल्लेख भाजपच्या आशिष शेलार यांच्या खूपच जिव्हारी लागलेला दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘शोले’ चित्रपटातील ‘असरानी’सारखी झाली आहे. अमित शहा यांच्यावर खालच्या पातळीत केलेली टीका आम्ही सहन करणार नाही. अन्यथा आम्हालाही मर्यादा सोडावी लागेल, असा इशारा आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. ते म्हणाले,”शोले चित्रपटात जसे असराणी म्हणतात, ”आधे इधर जावो, आधे उधर जावो” तशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे. याची सुरुवात तुम्ही केली. मात्र याचा शेवट आम्ही करू. अमित शाहांवर अशा प्रकारची टीका आम्ही सहन करणार नाही.” (Uddhav Thackeray’s condition is like Asrani in ‘Sholay’)

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला असून मर्यादेचे उल्लंघन केल्यास आम्हालाही पातळी सोडावी लागेल, असा इशारा दिला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची मनस्थिती, त्यांचा थयथयाट, तळतळाट, त्रागा, नैराश्य, वैफल्य या सर्व गोष्टी आम्ही समजू शकतो. राजकारण करताना आम्ही टीकेला घाबरत नाही. पण राजकारणाचेदेखील काही संकेत असतात, त्या संकेताप्रमाणे टीका करताना संयम आणि मर्यादा पाळण्याची आवश्यकता असते.” माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘मोगॅम्बो’ म्हणून हिणवलं होतं. मोगॅम्बोच्या अनेक पिढी उतरल्या तरीही शिवसेना संपणार नाही, अशा उपरोधिक शब्दांत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केली होती.

हे सुद्धा वाचा

VEDIO : सरकार जोमात, शेतकरी कोमात ; विरोधकांची सरकारविरोधात विधानभवनात घोषणाबाजी

तमासगीर गोपीचंद पडळकर, लाज वाटली पाहिजे ; अरविंद सावंताची जहरी टीका

दारूवाल्यांवर माविआ सरकारची खैरात, फाईल ओपन होणार ; आशिष शेलार यांचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी