नोकरी

येत्या तीन महिन्यांत होणार 30 हजार शिक्षकांची भरती

राज्यात येत्या तीन महिन्यात शिक्षकांची ३० हजार पदे भरली जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती (Teacher Recruitment)बंद आहे. ती पुन्हा सुरू करत येत्या तीन महिन्यांत शिक्षकांची ३० हजार पदे भरली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (30 thousand teachers will be recruited in the next three months)

मराठवाड़ा शिक्षक मतदारसंघातील भाजपचे (BJP) उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील वर्षानुवर्षे भरती न केल्यामुळे शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात मराठी माध्यमाची सर्वात जास्त ४४८१, तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी १७ पदे रिक्त आहे. उर्दू माध्यमाची पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त ३६ पदे रिक्त आहेत, तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ३ पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र एकही जागा रिक्त नसल्याचे दाखविण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाने शिक्षक बदली पोर्टलवर ४ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केलेली आहेत.

शिक्षक होण्यासाठी आता टीईटी (TET)ऐवजी आता टेट(TAIT) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर टेट परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. त्यासाठी अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देतील, असा अंदाज आहे. उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः दहा दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारीअखेरीस किती केंद्रे उपलब्ध होतील, त्याठिकाणी किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा :MPSC: ग्रामीण भागातील १३ हजार पदभरतीचा घोळ सुरूच; चार वर्षांपासून तिढा कायम

CISF मध्ये निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा..!

जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांच्या ‘थेट भरती’ची प्रतीक्षा कायम

आम्हीच मार्ग काढू; इतरांत धमक नाही
आता आपली अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात हा भार फार मोठा असणार नाही. जुन्या पेन्शन योजनेबाबत आम्ही नकारात्मक नाही. याबाबत वित्त, नियोजन विभागांसह सर्वांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. जे काही करायचे, ते आम्हीच करू शकतो. आमच्याशिवाय इतरांत ती धमक नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसला लगावला. जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी (NCP) चे नेते आता करीत आहेत. मात्र, जुनी योजना रद्द करण्याचे पाप त्यांच्याच सरकारने २००५ या वर्षी केले होते. माझा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वगळता राज्यात त्यांचेच सरकार होते; परंतु आता चर्चा घडवून लबाडी करीत असल्याची टीका त्यांनी केली.

Team Lay Bhari

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

3 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

3 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

3 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

4 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

4 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

4 hours ago