29 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरनोकरीCISF मध्ये निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा..!

CISF मध्ये निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा..!

देशभरातील पोलीस भरतीसाठी शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (Central Industrial Security Force) एकूण 451 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांच्या बंपर भरतीसाठी घोषणा केली आहे. आजपासून उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट www.cisfrectt.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतील. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे. त्यापैकी 183 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदांसाठी आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 27 वर्षे दरम्यान असावे. CISF च्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी देखील भरावी लागेल. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. SC/ST/EMS उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :पोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात होणार ७ हजार जागांसाठी पोलीस भरती

PM Jan Dhan Yojana : जन-धन योजनेतून आजवर 25 लाख कोटी रुपये वितरित केलेत! केंद्रीय मंत्र्याचे विधान

सीआयएसएफ चालक भरती प्रक्रिया :
फिजिकल ऑर्डर (PST)
फिजिकल एफिसिएंसी टेस्ट (पीईटी)
डॉक्यूमेंटेशन, ट्रेड टेस्ट
लिखित परीक्षा
वैद्यकीय विज्ञान

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी