महाराष्ट्र

माणगावमध्ये भीषण अपघातात ९ जण जागीच ठार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) माणगावमधील रेपोली गावानजीक ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात पाच पुरुष आणि चार महिलांचा मृत्यू झाला असून चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (9 people died in a terrible accident near Mangaon; A four-year-old boy survived) या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे रेपोली गावाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. चिपळूण जवळील लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक (क्रमांक : MH-43 /U/ 7119) व मुंबईकडून गुहागरकडे जाणाऱ्या इको गाडी (क्रमांक : MH- 48 BT8673) यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे ‘इको’ गाडी आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात ‘इको’ कारचा चक्काचूर झाला. गोरेगाव हद्दीतील रेपोलीनजीक ही दुर्दैवी घटना घडली. गाडीतील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांची शवे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. या अपघातात भव्य निलेश पंडित हा चार वर्षांचा मुलगा बचावला असून त्याच्यावर माणगावमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा  

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबई दौरा; वाहतुक व्यवस्थेत असतील ‘हे’ बदल

भारतात येणार कॅन्सर त्सुनामी; कर्करोगतज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांचा इशारा

मेट्रो 2 अ प्रकल्पातील कामचुकार कंत्राटदारांना केवळ 36 लाखांचा दंड; माहिती अधिकारातून बाब उघड

वर्षश्राद्धासाठी निघालेल्या मुंबईतील जाधव-पंडित कुटुंबांवर काळाची झडप

मुंबईतील जाधव आणि पंडित कुटुंब नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी गावी जात होते. पण रस्त्यातच काळाने या सर्वांवर झडप घातली. हे सर्वजण मुंबईतील मालाड आणि बोरिवली परिसरात वास्तव्याला होते. या दुर्घटनेची माहिती हेदवी येथील लोकांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र, अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून काही काळाने ही वाहतूक सुरळीत केली.

अपघातामधील मृतांची नावे :

  • अमोल रामचंद्र जाधव (वय ४०) हेदवी
  • दिनेश रघुनाथ जाधव (वय ३६) हेदवी
  • कांचन काशिनाथ शिर्के (वय ५०)
  • नंदिनी निलेश पंडित (वय ३५) डावखोत
  • निलेश पंडित (वय ४२) डावखोत
  • अनिता संतोष सावंत (वय ५५) सावंतवाडी
  • मुद्रा निलेश पंडित (वय १२) डावखोत
  • लाड मामा (वय ५८) डावखोत
  • निशांत शशिकांत जाधव (वय २३)
  • भव्य निलेश पंडित (जखमी)

कणकवलीत भीषण अपघातात चार ठार
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्येही भीषण अपघाताची घटना घडली आहे. आरामबस उलटून चार जणांचा मृत्यू तर २१ जण जखमी झळायची माहिती मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक एका खाजगी बसला पहाचे चार वाजता भीषण अपघात झाला.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago