31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार म्हणाले, म्हणून लस घेतानाचा फोटो मी शेअर केला नाही

अजित पवार म्हणाले, म्हणून लस घेतानाचा फोटो मी शेअर केला नाही

टीम लय भारी

मुंबई :-  अनेक नेत्यांनी कोरोनाची लस घेतानाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. परंतु हे नेते लोकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ते फोटो सोशल मिडियावर टाकतात. मला लस घेताना फोटो काढण्याची नौटंकी आवडत नाही. ‘मी फोटोसाठी हे करत नाही. फोटो काढून ते दाखवायला आपल्याला जमत नाही. मोठ्या लोकांनी फोटो काढले कारण त्यांचा आदर्श समोर ठेवून लोक लस घेतील. लस घेतानाचा माझा फोटो दाखवला तर जे लोक येणार आहेत, ते देखली लस घेण्यासाठी फिरकणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांनी कोविड संदर्भातील सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. लसीकरणाच्या सुविधा वाढवणार असल्याचे ही अजित पवार यांनी सांगितले. १ एप्रिलनंतर ४५ वर्षांच्या पुढील पत्रकारांनी लस घ्यावी. आमचे सहकारी देखील घेणार आहेत, असे ते म्हणाले. तोच धागा पकडून, तुम्ही कधी लस घेणार? असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर मी आधीच लस घेतली आहे असे ते म्हणाले. मग लस घेतानाचा फोटो का टाकला नाही, असे त्यांना विचारण्यात आले.

‘पुणे जिल्ह्यात रुगसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचे पथक आले होते. या पथकाकडून चाचण्यांवर भर देण्याचेच निर्देश दिले होते. त्यानुसार काम सुरू आहे. करोनाबाधितांची संख्या राज्यात जास्त आहे. त्याचबरोबर, चाचण्यांमध्येही राज्य देशात प्रथम आहे. यामध्ये राजकारण करून चालणार नाही,’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी