31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअंबानी कटुंबावर 'ईडी'ची वक्रदृष्टी; काल अनिल अंबानी तर आज टीना अंबानींची चौकशी

अंबानी कटुंबावर ‘ईडी’ची वक्रदृष्टी; काल अनिल अंबानी तर आज टीना अंबानींची चौकशी

उद्योगपती अनिल अंबानी हे गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता ‘ईडी’ची वक्रदृष्टी देखील त्यांच्यावर पडली आहे. कालपासून अनिल अंबानी कुटुंबियांची ‘ईडी’ चौकशी करत आहे. आज अनिल अंबानी आणि आज त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांची ईडीने चौकशी केली. उद्योगपती अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी आज ईडी कार्यालयात हजार झाल्या आहेत. परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे (FEMA) उल्लंघन केल्याप्रकरणी टीना अंबानी यांची आज चौकशी करण्यात आली. सोमवारी (3 जुलै) रोजी ईडीने फेमा प्रकरणी अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवला होता.

रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे परकीय चलन कायद्याच्या उल्लंघनाच्या चौकशीच्या संदर्भात सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. सकाळी दहा वाजता अनिल अंबानी कार्यालयात हजार झाले होते. त्यानंतर तब्बल सात ते आठतासानंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अनिल अंबानींच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे.

एस बँकेच्या कर्ज प्रकरणात बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यापूर्वी 2020 मध्ये ईडीसमोर हजर झाले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये स्विस बँकेतील खात्यात 814 कोटींच्या ठेवी दडवून ठेवत 420 कोटींचा कार चुकवल्या बद्दल आयकर विभागाने अनिल अंबानींना 8 ऑगस्ट 2022 रोजी नोटीस पाठवली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने 420 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अनिल अंबानी यांना दिलासा दिला होता.तसेच आयकर विभागाकडून अनिल अंबानी यांच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे आदेश कोर्टकडून देण्यात आले होते. तसेच मार्च 2020 मध्ये अनिल अंबानी यांची एस बँकेच्या एक्सपोजरच्या संदर्भात एडिएजीच्या स्थानाबाबत चौकशी करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा:

आमची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ – जयंत पाटील

संवैधानिक आणि नियमांचे पालन करून अपात्रतेबाबत निर्णय देऊ- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

विधानसभा अध्यक्षांविरोधात शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार

रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांनी ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, एडीएजी आणि एस बँक यांच्यातील सर्व व्यवहारांमध्ये कायद्याचे आणि आर्थिक नियमांचे पालन केले आहे. एस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आलेल्या प्रकरणात अंबानी यांना 2020 मध्ये ईडीसमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा अंबानी म्हणाले होते की, रिलायन्स समूहाचा कपूर, त्यांची पत्नी, मुलगी किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रित कोणत्याही संस्थेशी माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कुठलाही संपर्क नाही. आत्ता याच प्रकरणात अनिल अंबानी यांची पत्नी टिना अंबानी यांची ईडीच्या कार्यालयात बोलावून चौकशी करण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी