PHOTO : चैत्यभूमीवर देशभरातून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांचा महासागर लोटला

हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून दलितांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आज दादर चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा अलोट जनसागर लोटला होता. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन केले.

चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांचा जनसागर लोटला होता. यंदा लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आले होते.

शिवाजी पार्क येथे देखील मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. शिवाजी पार्क येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आंबेडकरी अनुयायी.

महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती. महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना अनुयायी.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी अनेक संस्था संघटना अन्नदान करत असतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून भोजन घेताना आंबेडकरी अनुयायी.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आलेले बौद्ध भिक्खू आणि भन्ते भीम ज्योतीला नमन करताना.

महापरिनिर्वाणदिनासाठी देशभरातून चैत्यभूमीवर आलेले श्रामणेर हातात फलक घेऊन शांतीचा तसेच आंबेडकारांचे विविध संदेश देताना.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक फुलांनी सजविलेले स्मारक.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास आणि कार्यांचे फोटो प्रदर्शन भरविण्यात आले होते. पोलीस दलातील एका कर्मचारी बाबासाहेबांच्या जीवनप्रवासातील काही क्षणचित्रे कॅमेराब्ध करताना.

चैत्यभूमीकडे येताना रस्त्यावर आबेंडकरी अनुयायांची लागलेली भलीमोठी रांग.

देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले अनुयायी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून मार्गक्रमण करताना.

बाबासाहेबांच्या ओढीने चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांच्या विश्रांतीकरिता मंडप उभारण्यात आले असून. मंडपात विसावलेले अनुयायी.

हे सुद्धा वाचा
राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

टीम लय भारी

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

3 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

5 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

6 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

7 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

8 hours ago