30 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरमुंबई'चैत्यभूमी' डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीला एका सोहळ्याचे स्वरुप आलेले असते, भीम गीते, पुस्तक विक्री हे येथील मुख्य आकर्षण चैत्यभूमीवरील हा सगळा पट डॉक्युमेंट्री मेकर सोमनाथ वाघमारे यांनी चैत्यभूमी डॉक्युमेंट्री फिल्मच्या माध्यमातून समोर आणला असुन या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर ही नुकताच रिलीझ झाला आहे.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी दरवर्षी लाखोंच्या संख्येने येत असतात. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर भीमसागर उसळलेला असतो. भीम गीते, पुस्तक विक्री हे येथील मुख्य आकर्षण चैत्यभूमीवरील हा सगळा पट डॉक्युमेंट्री मेकर सोमनाथ वाघमारे यांनी चैत्यभूमी डॉक्युमेंट्री फिल्मच्या माध्यमातून समोर आणला असुन या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर ही नुकताच रिलीझ झाला आहे.

सोमनाथ वाघमारे हे डॉक्युमेंट्री फिल्म मेकर असून त्यांनी दलित, वंचित समुहाचे प्रश्न समस्यांवर डॉक्युमेंट्रीज बनवतात. या आधी त्यांनी आय एम नॉट अ विच, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी, राजगृह स्टड्स टॉल अशा डॉक्युमेंट्रीज बनविल्या असून भारत पाटणकर आणि गेल ऑम्वेट यांच्यावर ‘गेल एंड भरत’ डॉक्युमेंट्री फिल्म देखील बनविली आहे. त्यानंतर सोमनाथ वाघमारे यांनी आता ‘चैत्यभूमी’ ही डॉक्युमेंट्री बनविली असून तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक पा. रंजीत यांची प्रस्तुती आहे.


या फिल्मचे पोस्टर सुजात आंबेडकर यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. यावेळी निशांत रॉय बोंबार्डे, प्रविण डाळींबकर आणि शमिभा पाटील उपस्थित होते. चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनी होणारा हा आंबेडकरी सांस्कृतिक महोत्सव, देशभरातून येणारे बाबासाहेबांचे अनुयायी यांचे चित्रण असणारी ही डॉक्युमेंटरी आहे.
हे सुद्धा वाचा
इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण
अशा वातावरणात त्यांनी येथे येऊ नये अन्यथा…, बोम्मईंचा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला इशारा
बाबरी मशीद वादावरून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त
या फिल्मचे प्रस्तुतकर्ता पा. रंजीत यांनी या फिल्मचे पोस्टर आणि ट्रेलरची युट्यूब लिंक ट्विटरवर शेअर केली आहे. ही डॉक्युमेंट्ररी नीलम सोशल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लवकरच रिलीझ होणार आहे. तसेच विविध चित्रपट महोत्सवांमध्ये देखील या डॉक्युमेंट्री फिल्मचे स्क्रिनिंग होणार आहे. पा. रंजीत हे तमीळ चित्रपट सृष्टीतील दलित, वंचित समुहाच्या समस्या, अन्याय अत्याचारांवरांना चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडणारे अंत्यत प्रभावी दिग्दर्शक आहेत. पा. रंजित यांचे कर्णन, कबाली, काला, पेरियेरुम पेरूमल अशा अनेक चित्रपटांची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!