महाराष्ट्र

प्रदेश काँग्रेसची दोन दिवसीय ‘नवसंकल्प कार्यशाळा’ आजपासून शिर्डीत : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

नाशिक  : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत आजपासून सुरु होत आहे. १ व २ जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील रोडमॅप तयार केला जाणार असल्याची माहिती, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली. (Balasaheb Thorat Congress Navasankalp Workshop Shirdi)

यासंदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दोन दिवसाचे नवसंकल्प शिबीर नुकतेच उदयपूर येथे पार पडले. या शिबिरातील घोषणापत्राची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. यासाठी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी सहा गट स्थापन करण्यात आले आहेत. हे सहा गट घोषणापत्राच्या अमंलबजावणीसंदर्भात रोडमॅप तयार करतील आणि त्यावर समूह चर्चा होईल तर दुसऱ्या दिवशी या सहा गटांच्या अहवालांचे सादरीकण केले जाईल. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या कार्यशाळेला पक्ष प्रभारी एच. के. पाटील. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्रीमंडळातील सर्व मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित असतील, असे थोरात यांनी सांगितले.


हे सुद्धा वाचा :

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणा-या धर्मांध शक्तींना कोल्हापूरच्या जनतेने नाकारले : बाळासाहेब थोरात 

पक्ष संघटनेच्या तळाशी राहून प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब थोरात : सत्यजित तांबे

महागाई विरोधात बाळासाहेब थोरात यांचा आक्रमक पवित्रा

Video : बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात एक दिवस कॉंग्रेसचा हात येणार आहे; पण…

 

Pratiksha Pawar

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

5 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

7 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

7 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

8 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

9 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

10 hours ago