29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयमहागाई विरोधात बाळासाहेब थोरात यांचा आक्रमक पवित्रा

महागाई विरोधात बाळासाहेब थोरात यांचा आक्रमक पवित्रा

टीम लय भारी 

मुंबई: इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (Balasaheb Thorat criticize BJP government)

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात जनसामान्य त्रस्त आहेत.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज महागाईच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. महागाईच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे.

त्यांनी आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात पुणे काँग्रेस आयोजित ‘महागाई मुक्त भारत’ जन आंदोलनात भाग घेतला.  महागाईची गुढी उभारून सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला आहे.Congress Mehngai Mukt Bharat Abhiyan Update

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी तातडीने सरकारने पाऊले उचलावीत. जनसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. balasaheb-thorat-criticize-bjp-government

हे सुध्दा वाचा :

Balasaheb Thorat : महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी आमदार जयकुमार गोरेंची घेतली फिरकी…

https://www.financialexpress.com/hindi/india-news/congress-to-launch-three-phased-mehngai-mukt-bharat-abhiyan-check-here-in-details/2472675/

महिला पत्रकार राणा अयुब यांना मुंबई विमानतळावर का रोखलं?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी