महाराष्ट्र

काँग्रेसची सत्ता देशात व राज्यात येण्यासाठी प्रयत्न करणार :  बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजित करण्यात येणार आहे. १ व २ जून रोजी या शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रसंगी बोलताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेसच्या रणनीती विषयी महत्त्वाचे विधान केले आहे.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थीतीवर भाष्य केले आहे. सध्या देशातील राजकीय वातावरण संपूर्णपणे बदले आहे. देशात प्रत्येक दिवशी संविधानावर घाला घातला जात आहे.

देशात काँग्रेसची विचारधारेलाच संपवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जातं आहे. असे हल्ले परतवण्यासाठी काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. सर्वात महत्वाची विचारधारा आहे, ती रुजली पाहिजे.

देशात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करु. या देशात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता यासाठी प्रयत्न करुया, असं थोरात यांनी म्हटले आहे.

या शिबिराला राज्यातील मंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. उदयपूरच्या नवसंकल्प शिबिरातील सर्व मुद्दे राज्यातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवले जातील, अशी माहिती पक्ष प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

 

 

हे सुद्धा वाचा : 

राज्यात ६६ हजार रोजगार निर्माण होणार, जागतिक आर्थिक परिषदेत ३० हजार कोटींचे करार

Kerala Chief Minister’s “System” Jibe At Congress Over Defections

Shweta Chande

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

3 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

3 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

4 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

4 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

4 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

4 hours ago