महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘महाराजांनी औरंगजेबाला माफीसाठी 5 पत्रे लिहिली होती’, भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली

सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात आहे. याच यात्रेतील एका सभेत बोलत असताना काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वाद निर्माण झाला. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच प्रसारमाध्यमांतूनही राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना,’ असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्रिवेदी यांच्या या वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

हे सुद्धा वाचा

Jaya Bachchan : साडीबाबत जया बच्चन यांनी मांडले परखड मत

Russia Ukraine war : युद्धाच्या धामधूमीत ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर

Shraddha Walker murder : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात खळबळजनक व्हिडीओ समोर

दरम्यान, महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानेही राजकीय वातावरण तापलं आहे. ‘महाराष्ट्रीय माणसांना विचारले की, तुमचा आदर्श कोण आहे, आजच्या युगात बोलायचे झाले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरी यांच्यापर्यंतची नावे समोर येतील. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील नायक आहेत’, असं कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

या सर्व विषयांवरून सध्या महाराष्ट्राचे राजकिय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय प्रत्येक पक्ष आणि संघटना एकमेकांच्या वक्तव्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलने करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणात महाराष्ट्रातील आणि देशांतील अनेक महापुरुषांच्या नावांची नाहक बदनामी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

6 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

6 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

7 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

7 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

7 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

17 hours ago