31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरेंना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा!

उध्दव ठाकरेंना पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा!

टीम लय भारी

नवी दिल्ली : शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी पूर्ण केली. (PM Narendra Modi wishes CM Uddhav Thackeray on his birthday) “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो” असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रही पाठवले आहे. “वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे” असे मोदींनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘धाकटा भाऊ’ असा केला होता. परंतु, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली युती तुटल्यानंतर डिसेंबर महिन्यात मोदी आणि ठाकरे यांची पुण्यात पहिल्यांदा भेट झाली होती. राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचं स्वागत केलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी