31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रCongress- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि अतुल लोंढे नाराज!

Congress- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि अतुल लोंढे नाराज!

लय भारी टीम

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council elections) काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना डावलून काँग्रेसने राजेश राठोड (Rajesh Rathod) यांना संधी दिल्याने त्याविषयीची नाराजी आणि त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटत आहेत. काँग्रेसचे अभ्यासू व आक्रमक चेहरा असलेले प्रवक्ते सचिन सावंत आणि अतुल लोंढे यांनी आपली नाराजी मंगळवारी प्रकट केली.

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सचिन सावंत (Sachin Sawant) आणि विदर्भातील नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्या नावाची मोठी चर्चा होती. अखेरच्या दिवसापर्यंत या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल, असेच वातावरण होते. मात्र काँग्रेसने राजेश राठोड यांना उमेदवारी दिल्याने सावंत आणि त्यांच्यासोबत लोंढेही नाराज झाले असल्याचे सांगण्यात येते.

सावंत यांनी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेससाठी प्रामाणिकपणे काम करूनही त्यांना यावेळी विधान परिषदेसाठी डावलले गेल्याने त्याविषयीची तीव्र नाराजी वरिष्ठांपर्यंत कळविली असल्याचे सांगण्यात येते. सावंत यांनी आपल्या ट्विटर वरून काँग्रेसचे प्रवक्तेपद हटविले होते. नंतर ते कायम केले. पण त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत या नाराजीचे पडसाद म्हणून काँग्रेसला आपला एक अभ्यासू आणि आक्रमकपणे भूमिका मांडणारा प्रवक्ता गमवावा लागेल, असेही बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी