31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

टीम लय भारी

सोलापूर : महापालिका अधिका-यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्या प्रकरणी राजेश काळे (Rajesh Kale) यांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी काळे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.

दरम्यान, वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजेश काळे हे आमदार सुभाष देशमुख गटाचे आहेत. ही घोषणा या गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी केली.

हा अहवाल शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही पाठवला होता. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी सोलापुरात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठवण्यात आला. प्रदेश भाजपने काळे यांची हकालपट्टी झाल्याचे जाहीर केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी