गोगलगायीच्या त्रासाने धनंजय मुंडे वैतागले!

टीम लय भारी 

परळी : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील कुठल्या भागांत मुसळधार तर कुठे संततधार अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा वरुणराजाने यंदा उशीरा का होईना पण दमदार हजेरी लावली. परंतु, जिल्ह्यातील सोयाबीन पीक गोगलगाईंच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्याने बळीराजा मात्र हैराण झाला आहे. दरम्यान, बळीराजाला दिलासा देण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी यावेळी केली आहे.

बीड जिल्ह्यांत प्रमुख पीकांपैकी सोयबीनचे पीक महत्त्वाचे गणले जाते. बीड जिल्ह्यांत सोयाबीनच्या पेरणीनंतर पाऊस काही काळ लांबला, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. दरम्यान या जोरदार पावसामुळे पीकांवर गोगलगाईंचा प्रभाव वाढला आणि याचा फटका मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाला बसला.

शंखी आणि अन्य प्रकारातील गोगलगायींच्या भक्षस्थानी सोयाबीनचे बरेचसे क्षेत्र पडल्यामुळे बळीराजा संकट पुन्हा वाढले. गोगलगायींनी उगवलेली रोपटे खाऊन नष्ट केली त्यामुळे पेरणी केलेल्या सोयाबीन पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, यापूर्वी कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन – कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला.

तसेच ऐन पेरणीच्या हंगामात तत्कालीन कृषी मंत्री सहलीवर गेले, शिवाय नवीन सरकारमध्ये अद्याप खातेवाटप झालेले नाही त्यामुळे गोगलगायांचा वाढचा प्रादुर्भावाचे संकट बळीराजासमोर आ वासून उभे राहिले आहे. हाच मुद्दा गांभिर्याने उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी मदतीचे आवाहन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.

धनंजय मुंडे म्हणतात, पेरणी करून 100% नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणी करणे असे मोठे दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या समोर आहे, त्यामुळे कृषी व महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करून राज्य सरकारने संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, असे मुंडे यांनी म्हटले आहे..

दरम्यान, गोगलगाईमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन सह इतर पिकांचे नुकसान आणि प्रशासन करत असलेल्या व्यवस्थापनाची धनंजय मुंडे यांनी रविवारी अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना माहिती घेतली. अंबाजोगाई तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्याकडून संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन कृषी व महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनास कळवावा व शासनाने दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करून ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा…

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा, आता सुरू होणार मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग

OBC आरक्षणावर आज न्यायालयात निकाल, पण त्या अगोदरच धनंजय मुंडेंनी दिले २७ टक्के आरक्षण !

देशात चाललंय तरी काय… महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात सुद्धा बंडाची तयारी?

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

11 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

12 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

12 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

12 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

18 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

19 hours ago