महाराष्ट्र

भुसावळमध्ये भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे हादरे बसले आणि एकच खळबळ उडाली. भुसावळ, सावदा परिसरात आज सकाळी 10.35च्या सुमारास ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके जाणवले. याप्रसंगामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. (Earthquake tremors in Bhusawal; An atmosphere of fear among citizens)

नाशिक शहरापासून 278 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुसावळ, सावदा परिसरात भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10.35 च्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नाशिक केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल तीव्रता नोंदवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत. दरम्यान, भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. त्याचप्रमाणे हतनूर धरणाला काहीही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जळगाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या सूचनेनुसार, आज सकाळी 10.35 वा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहेत.

हे सुद्धा वाचा : भूकंपाने हादरले मुळशी 

दिल्ली, नोएडा, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

सुरेश जैन यांच्या पंटरांचे जळगावात नसते उद्योग; शहर भकास करणारा म्हणे करेल विकास!

या प्रसंगवधनानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी परिसरातील नागरिकांना प्रसिद्धी पत्रकान्वये काही महत्वाच्या बाबी कळविल्या आहेत.

भूकंपादरम्यान काय कराल ?
जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?
घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा.

जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?
पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका.उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.

भूकंपादरम्यान काय करावे ?
जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

भूकंपानंतर काय करावे ?
रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा, असे या परीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

6 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

6 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

7 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

7 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

13 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

14 hours ago