35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रED & NIA Raid : ईडी, एनआयएच्या गळाला मोठा मासा, 20 जण...

ED & NIA Raid : ईडी, एनआयएच्या गळाला मोठा मासा, 20 जण अटकेत

पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले तर जात नाही ना याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत, त्यामुळे कोणती महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार यावर आता उलट - सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सदर वृत्त एएनआयने दिले असून या घडामोडी कशा वेग घेताहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील आज विविध ठिकाणी सक्तवसुली संचलनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांना वेग आल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही केंद्रीय यंत्रणांनी आज सकाळपासूनच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडिया’च्या जिथे जिथे मालमत्ता आहेत त्या ठिकाणी छापे टाकण्यास सुरवात केली आहे, शिवाय त्यांच्या कार्यालयांवर सुद्धा छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा परिसरात पीआयएफच्या कार्यालयांचा समावेश आहे. या सगळ्याच कार्यालयांची या दोन्ही यंत्रणांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. गेल्या सहा तासांपासून ही कारवाई सुरू असून अद्याप ही कारवाई थांबलेली नाही. सदर कारवाईतून काय उघड होणार हे पाहणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच सक्तवसुली संचलनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या विविध ठिकाणच्या मालमत्तेवर छापे टाकण्यात येत आहेत. मालेगाव येथील पीएफआय संघटनेच्या सैफुरहेमान नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच पुण्यातील कोंढवा परिसरातून पीएफआय संघटनेचे पदाधिकारी अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. दरम्यान या यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या इतर राज्यांतील कार्यालयांवर सुद्धा धाडी टाकल्या आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा यात समावेश आहे.

हे सुद्धा वाचा…

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’ आजारावर कोल्हापूरकरांचा अनोखा उपाय

Job Updates : मराठी मुलांसाठी ‘येथे’ नोकरीची सुवर्णसंधी

IND VS AUS : भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या मनात उकळ्या! खास् ट्वीट केले शेअर

पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियातील निधीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होत असल्याचा या यंत्रणांना संशय असल्यानेच सदर कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत एनआयए, ईडी, एटीएस आणि जीएसटीतील असे सगळेच अधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. या पीएफआयचे मुख्य कार्यालय पुण्यात असून या कार्यालयातून अनेक गोष्टी सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान नवी मुंबईतील नेरुळ येथे असणाऱ्या सेक्टर 23 मधील दारावे गावातील पीआयएफच्या कार्यालयांवर सुद्धा ईडी आणि एनआयकडून छापे पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून अजूनही कारवाई सुरू आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले तर जात नाही ना याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत, त्यामुळे कोणती महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार यावर आता उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सदर वृत्त एएनआयने दिले असून या घडामोडी कशा वेग घेताहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी