महाराष्ट्र

Eknath Khadse : खडसेंचा ठिय्या, बिघडलेली तब्येत अन् राष्ट्रवादीचे आंदोलन, पाहा नक्की काय झालं

राज्यातील राजकारणात दरवेळी वेगवेगळ्या कारणामुळे कोणी ना कोणी कायम चर्चेत असतेच. राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंच्या कालच्या ठिय्या आंदोलनाची सध्या तुफान चर्चा होत आहे. जिल्हा दूध संघातील करोडोंच्या गैरव्यवहार प्रकरणी तब्बल 16 तासांपासून ठिय्या आंदोलन करत असलेले एकनाथ खडसे यांची अचानक तब्येत बिघडली परंतु त्याही परिस्थितीत रस्त्यावर आंदोलन चालू ठेवत तिथेच त्यांनी मुक्काम केला. आज मेलो तरी गुन्हा दाखल केल्याशिवाय परत जाणार नाही असे ठामपणे म्हणत सदर गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर खडसे यांनी निक्षून सांगितले. एकनाथ खडसे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सदर गैरव्यवहार प्रकरणी पोलिस नेमकी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कालपासून खडसेंचा ठिय्या, बिघडलेली तब्येत अन् राष्ट्रवादीचे आंदोलन याबाबतच सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी दुपारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या दालनात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी ठिय्या मांडला. सध्या शहरात लोणी, बटर व तुपावरुन दूध संघाचे वातावरण बिघडले असून लोणी व बटरच्या विक्रीत तब्बल एक कोटी 15 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याच गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी खडसेंनी थेट पोलिस ठाणे गाठले. याचवेळी पोलीस निरीक्षकांच्या दालनात रक्तदाब वाढल्याने खडसेंची तब्येत बिघडली तरीसुद्धा त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.

जिल्हा दूध संघात झालेल्या या गैरव्यवहाराबाबत बोलताना खडसे म्हणाले, जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैर व्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली आहे असा आरोपच खडसेंनी यावेळी केला. पुढे खडसे म्हणाले, 6 तास ठिय्या मांडूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला असून जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा सज्जड दमच एकनाथ खडसे यांनी यावेळी दिला. तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्याच अवस्थेत त्यांनी रात्रभर पोलिस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन चालूच ठेवले.

हे सुद्धा वाचा…

Rutuja Latke : अखेरीस प्रश्न सुटला! ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा, महापालिकेने स्विकारला राजीनामा

Washim News : ‘शेतकऱ्यांना भिख नको….कुत्रे आवरा’, बळीराजा संतापला

Chal Ab Wahan : वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’! मराठमोळ्या जोडीचा हिंदी रोमँटिक अंदाज

गैरव्यवहाराबाबत सांगून सुद्धा त्याची कोणी दखल घेत नाही, शिवाय गुन्हा सुद्धा दाखल होत नसल्याने राजकीय दबावापोटीच पोलिस हा गुन्हा दाखल करत नसल्याचा दावा यावेळी एकनाथ खडसेंनी यावेळी केला. अनेक तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर शहर पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे निवेदन स्विकारले, मात्र यानंतर अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. करोडोंचा गैरव्यवहार झाला तरीही पोलिस दुर्लक्ष करीत असून त्यावर कोणती कारवाई करत नसल्याने खडसे आणि कार्यकर्ते संतप्त झाले आणि दालनातच पोलिसांविरोधात घोषणाबाजी करत पोलिस प्रशासनाविरोधात राग व्यक्त केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असा आक्रमक पवित्राच एकनाथ खडसेंनी यावेळी घेतला.

आंदोलना दरम्यान एकनाथ खडसेंची प्रकृती अचानक बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला, त्याचवेळी त्यांची तपासणी करत आली परंतु तब्येत बिघडलेल्या अवस्थेत सुद्धा त्यांनी पोलिस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावरच बसून आंदोलन चालूच ठेवले त्यामुळे त्यांनी केलेल्या मागणीला आता कितपत यश मिळणार, गैरव्यवहार प्रकरणाचा बुरखा कधी फाडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

6 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

6 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

7 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

7 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

9 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

9 hours ago