31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईRutuja Latke : अखेरीस प्रश्न सुटला! ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा, महापालिकेने...

Rutuja Latke : अखेरीस प्रश्न सुटला! ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा, महापालिकेने स्विकारला राजीनामा

मुंबई पालिकेनं ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभुतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा बीएमसीने अडवून ठेवला होता. अखेरीस मुंबई कोर्टाच्या दणक्यानंतर मुंबई पालिकेनं ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंनी आपला उमेदवारही घोषित केला. मात्र, त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला राजीनामा स्वीकारला जावा, अशी मागणी केली. त्यानंतर राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मशाल हे चिन्ह आपल्यासाठी नवीन आहे. छगन भुजबळ 1985 साली या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मशाल हे चिन्ह आपल्यासाठी शुभ आहे, असे देखील लटके म्हणल्या.

हे सुद्धा वाचा

Washim News : ‘शेतकऱ्यांना भिख नको….कुत्रे आवरा’, बळीराजा संतापला

Chal Ab Wahan : वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’! मराठमोळ्या जोडीचा हिंदी रोमँटिक अंदाज

T20 World Cup : ‘टीम इंडियासाठी धोक्याची घंटा!’ भारताचे सुपरस्टार ऑस्ट्रेलियात जाऊन फ्लॉप

महापालिकेनं राजीनामा स्वीकारल्याच्या पत्रात काय म्हटलंय?
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने, मा. उच्च न्यायालयातील मा. न्यायमूर्ती नितीन जामदार तसेच मा. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दि. 13.10.2022 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, आपल्या उपरोक्त विषयासंदर्भातील 3.10.2022 रोजीच्या अर्जाबाबत कळविण्यात येते की, आपला बृहन्मुंबई महापालिकेचा राजीनामा 13.10.2022 (कार्यालयीन वेळेनंतर) पासून स्वीकृत करण्यात येत आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना मुरजी पटेल यांनी 30 हजारपेक्षा जास्त मतांनी जिंकून येईन असा विश्वास व्यक्त केलाय. अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असला तरी युती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना गट युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि सभा तसंच रोड शोमध्येही सहभागी होणार असं या बैठकीमध्ये ठरलं आहे. शिंदे गटाकडूनही डमी उमेदवार दिला जाणार अशी शक्यता होती. पण, आतापर्यंत झालेला संघर्ष पाहता शिंदे गटाकडून डमी उमेदवार उभं करण्याचा प्रस्ताव आता मागे घेण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी