31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रखळबळजनक : भाजपचा टी शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

खळबळजनक : भाजपचा टी शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

लय भारी न्यूज नेटवर्क

बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव, बुलढाणा येथील प्रचार दौऱ्यावर आहेत. त्याच सुमारास एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा मेसेज व फोटो व्हायरल झाला आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर भाजपचा टी शर्ट आहे. त्यावर ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असे लिहिलेले आहे.

एका झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मतदार संघातील ही घटना आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे सकाळी 11 वाजता या शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे व्हायरल झालेल्या मजकुरात नमूद करण्यात आले आहे. राजू ज्ञानदेव तलवारे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी