31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रगेट परीक्षेचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर

गेट परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

टीम लय भारी

मुंबई :-  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई गेट परीक्षेचा निकाल २२ मार्च, २०२१ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE) परीक्षेचा निकाल आयआयटी गेट परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर gate.iitb.ac.in जाहीर केला जाईल.

असा पहा गेट परीक्षेचा निकाल

गेट परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी प्रथम सर्व उमेदवारांनी गेटची अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. मग होम पेजवर गेट २०२१ परिणाम लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. तुमचा अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड तिथे प्रविष्ट करा. यानंतर लॉगिन यशस्वी झाल्यावर त्याचा परिणाम स्क्रीनवर दिसून येईल. यानंतर, गेट २०२१ चा निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.

फेब्रुवारीमध्ये जाहीर केली होती उत्तरपत्रिका

गेट परीक्षा २०२१ ची उत्तरपत्रिका २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना ४ मार्च २०२१ पर्यंत हरकती घेण्यास परवानगी देण्यात आली. या हरकतींचा आढावा घेतल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. यावर्षी ९ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. एकूण विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के विद्यार्थी या परीक्षेला बसले. गेट परीक्षा २०२१ स्कोरकार्ड तीन वर्षांसाठी वैध असेल.

एकूण २७ पेपर्ससाठी परीक्षा

ही परीक्षा एकूण २७ पेपर्ससाठी घेण्यात आली होती, त्यामध्ये दोन नवीन विषय समाविष्ट करण्यात आले होते. या विषयात पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि ह्युमॅनिटिज आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश आहे. आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. तसेच कोविड-१९ महामारीमुळे गेट २०२१ मध्ये अर्ज करण्यासाठी किमान पात्रतेत सवलत देण्यात आली होती. घोषणेनुसार, पदव्युत्तर पदवीसाठी तृतीय वर्षाचे उमेदवार गेट २०२१ साठी पात्र होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी