महाराष्ट्र

साहेब पोहायला गेले आणि….

टीम लय भारी

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली. महसूल कर्मचारी मुकुंद त्र्यंबक चिरके तलावात पोहायला गेले असताना दम लागल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ भोईजल संघाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला असला तरीही चिरके यांच्या मृत्यूने अधिकारी वर्गाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पोहण्यात कुशल असणारे मुकुंद चिरके पाण्यात बुडाल्याने आश्चर्यसुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल कर्मचारी मुकुंद चिरके आपल्या मित्रांसोबत दररोज तलावात पोहण्यास जात असत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ते मित्रांसोबत पोहण्यासाठी गेले. दरम्यान, “पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन येतो” असे म्हणून ते निघाले, मात्र पाण्याच्या मध्यभागी जाताच त्यांना दम लागला. त्यांनी त्यावेळी वाचवण्यासाठी मित्रांना हाताने इशारा केला, मित्रांनी सुद्धा किनाऱ्यावरील होडीचा सहारा घेत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला परंंतु तोपर्यंत चिरके पाण्यात बुडाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भोरच्या भोईजल संघच्या पथकाने पाण्यात उतरत शोधमोहीम राबवली आणि साधारण दुपारी 2 च्या सुमारास मुकुंद चिरके यांचा मृतदेह शोधण्यास यश आले. चिरके हे भोरच्या तहसील कार्यालयात दाखला कारकुन म्हणून कार्यरत होते. यांच्या मृत्यूने अधिकारी वर्गातून चांगला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेचे कळताच भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील, मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, गाव कामगार तलाठी विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहायक फौजदार उमेश जगताप व महसूल कर्मचारी यांनी सुद्धा तातडीने घटनास्थळी धाव घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा…

पुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग? दुसऱ्यांदा बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

प्रियकराने पळवून नेलेल्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

सीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

5 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

6 hours ago

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या…

6 hours ago

भाडेकरूचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी…

6 hours ago

नाशिक मध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas…

6 hours ago

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

12 hours ago