25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeव्हिडीओVideo : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही 'भारत जोडो यात्रेत'!

Video : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’!

या भारत जोडे यात्रेमध्ये मुस्लिम समाजातील काही लहान मुले देखील सहभागी झालेली पाहायला मिळाली. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे या यात्रेमध्ये मुस्लिम समाजातील लहान मुलांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक तरुण-तरुणी, वयोवृद्ध इतकेच नाही तर लहान मुले नटून थटून या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील यात्रेला नागरिकांकडून मोठा पाठिंबा देण्यात आलेला आहे. या यात्रेमध्ये काँग्रेसचेचं नेते नाही तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर सामाजिक संघटना देखील सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी हे समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन या यात्रेत चालत निघालेले आहेत. कोणताही समाज असो सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचा ध्येय राहुल गांधींनी या भारत जोडे यात्रेच्या माध्यमातून करण्याचा निश्चय केलेला आहे.

या भारत जोडे यात्रेमध्ये मुस्लिम समाजातील काही लहान मुले देखील सहभागी झालेली पाहायला मिळाली. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे या यात्रेमध्ये मुस्लिम समाजातील लहान मुलांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. ‘भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही भारत जोडे यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्या सोबत सहभागी झालेलो आहोत,’ असे या लहान मुलांकडून यावेळी सांगण्यात आले. दरम्यान या यात्रेमध्ये सर्व समाजातील लोकांचा मिळत असलेला प्रचंड पाठिंबा हे या यात्रेचे केंद्रबिंदू बनत आहे. सध्या यात्रेमध्ये बॉलीवूडमधील अभिनेता-अभिनेत्री देखील सहभागी होताना दिसून येत आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी