महाराष्ट्र

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळयातील आरोपी जेलमध्ये जातील असे सोशल मीडियावर सांगितले. त्या वेळपासून सगळीकडे याच विषयाची चर्चा रंगली आहे. सिंचन घोटाळयातले नेमके आरोपी कोण आहे. कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे बोट दाखवते आहे. तर कोणी असे पाच नेते आहेत असे म्हणतात. सिंचन घोटाळयाप्रकरणी नवनवी गोष्टी पुढे येत आहेत. मात्र या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तर्कविर्तकांना उधाण आले आहे. खरं तर सिंचन घोटाळा हा 2012 साली उघडकीस आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात हा घोटाळा उघड होईल असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला.

या प्रकारणाला फडणवीस सरकारच्या काळात क्लिनचिट मिळाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र‍ अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईडीच्या कचाटयात सापडून तरुंगात गेल्यावर हे प्रकरण ऐरणीवर आले आहे. ते मोहित कंबोज यांच्या‍ व्टीटमुळे. मोहित कंबोज जे बोलतात, त्याप्रमाणे काही दिवसांत त्या गोष्टी घडतात असा समज देशात निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हे सुद्धा वाचा

Mahadev Jankar : धनगर समाजातील मुलांना राज्य सरकारकडून मिळणार ‘या’ सवलती

Haribhau Rathod : हरिभाऊ राठोडांनी बदलली पार्टी, थेट ‘आम आदमी पार्टी’त प्रवेश

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

जलसिंचन विभागाचे मुख्य अभ‍ियंता विजय पांढरे यांची माध्यमांनी अनेकवेळा मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी चितळे समितीचे दाखले देत हा सिंचन घोटाळा किती भयंकर आणि व्यापक आहे हे स्पष्ट केले आहे. सिंचन विभागात खालच्या स्तरापासून अगदी वरच्या स्तरापर्यंत कसा भ्रष्टाचार झाला हे त्यांनी अनुभवले आहे. त्यांच्यावर अनेक वेळा दबाब देखील टाकण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांना यापूर्वी सांगितले आहे. फडणवीस सरकाने 5 वर्षांमध्ये या प्रकरणाची चौकशी केली नाही. कारण राजकारणांमध्ये सत्ताधारी आणि विरोध यांचे साटेलोटे असते, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे कदाचित हे घडले नाही.

सिंचन (Irrigation) घोटाळयात अजित पवारांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. त्यामुळे हे प्रकरण समोर आल्यापासून संशयाची सुई त्यांच्याकडेच आहे. एसीबीने अजित पवारांना क्लिनचिट दिली असे बोलले जाते. सिंचन घोटाळा चौकशी प्रकरणी चितळे सम‍ितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सर्व बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यामध्ये 7 बाबी नमूद केल्या आहेत. त्यातून हा घोटाळा मोठा आणि गंभीर असल्याचे स्पष्ट होते असे अभ्यासकांचे मत आहे. या अहवालामध्ये भ्रष्टाचार, अन‍ियमितता, वाढवलेल्या किंमती, टेंडर मॅनेज केल्याचे गभीर आरोप करण्यात आले आहेत. चितळे समितीने या प्रकरणी पॉवर फूल समिती नेमण्याची विनंती सरकारला केली होती. परंतु या गोष्टी फडणवीस सरकारच्या काळात झाल्या नाही. 2019 साली आलेल्या 80 तासांच्या फडणवीस पवार सरकारनेही या गोष्टीकडे लक्ष द‍िले नाही, उद्धव ठाकरेंच्या काळातही याची चाैकशी केली नाही.

आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात हा घोटाळा उघड होईल का? प्रश्न या निम‍ित्ताने सर्वांना पडला आहे. जर या प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी झाली तर दोन दिवसांत यातले आरोपी जेलमध्ये जाऊ शकतात. तसेच परमवीर सिंह यांनी या प्रकरणी चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचेही बोलले जाते. हा घोटाळा आकडेवारीसह चितळे समितीने सादर केला आहे. परंतु त्याच्यावर कारवाई होत नाही. या प्रकरणी नव्याने काही पुरावे सादर करण्याची गरज नाही. अन‍िल देशमुख, संजय राऊत, नबाब मलिक यांच्या भ्रष्टाचारापेक्षा देखील हा घोटाळा मोठा असल्याचे बोलले जाते आहे. हा घोटाळा लाखो कोटींचा आहे.

या घोटाळयांच्या प्रकल्पाच्या किंमतीमध्ये टेंडर मॅनेज केले आहेत. प्रकल्पाच्या किमती दुपटीहून अधिक वाढविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांसाठी काही अध‍िकाऱ्यांच्या बदल्या देखील झाल्या आहेत. वाघुर प्रक्लपातील तापी महामंडळाच्या टेंडरमध्ये खाडाखोड झाल्याचे आरोप विजय पांढरे यांनी केले आहेत. प्रत्यक्ष खालच्या स्तरापासून सिंचन घोटाळयाची पूर्ण चौकशी झाली तर खरे आरोपी जगासमोर येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन भाषण करतांना भ्रष्टारातून देशाला मुक्त करण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे हा घोटाळा ते बाहेर काढतील का याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha election) प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) तोंड उघडले की वाद…

38 mins ago

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे RSS चे एजंट

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा, म्हणजेच पाचवा टप्पा उरलेला आहे. या टप्प्यात मुंबई, ठाणे व उत्तर…

57 mins ago

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

1 hour ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

2 hours ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

2 hours ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago