30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराष्ट्रीयHimachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे सुमारे 1,135 कोटींचे नुकसान झाले आहे. हिमालयातील अनेक जिल्हे हे दरवर्षी ढगफुटीमुळे अडचणीत येतात. मात्र मोदी सरकारचे या कडे लक्ष नाही. भारताचा उत्तरेकडील आणि ईशान्य पूर्वेकडील भाग हा नेहमीच नैसर्गिक संकटांचा सामना करतो.

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे सुमारे 1,135 कोटींचे नुकसान झाले आहे. हिमालयातील अनेक जिल्हे हे दरवर्षी ढगफुटीमुळे अडचणीत येतात. मात्र मोदी सरकारचे या कडे लक्ष नाही. भारताचा उत्तरेकडील आणि ईशान्य पूर्वेकडील भाग हा नेहमीच नैसर्गिक संकटांचा सामना करतो. मात्र मोदी सरकार त्यावर ठोस उपाय योजना कधी करणार हा प्रश्न या निम‍ित्ताने ऐरणीवर आला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये ढगफूटीमुळे सुमारे 22 जणांचा बळी गेला आहे. रेल्वे ब्रिज कोसळला असून, मंडी, चंबा आणि कांगडामधील शाळा कॉलेज बंद आहेत. कांगडामध्ये 24 तासांमध्ये धुवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे महापूर आला आहे.

या महापूरामुळे 1929 मध्ये बांधलेला 800 मीटर लांबीचा पठाणकोट-जोगिंद्रनगरचा रेल्वे पूर वाहून गेला. पंजाबच्या पठाणकोटला जोडणारा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे नागर‍िकांचे प्रचंड हाल झाले आहेत.  या घटनेमुळे हिमाचल प्रदेश मधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. ह‍िमाचल प्रदेशातील या महापूरामध्ये सुमारे 22 जणांचा बळी गेला असून, 6 जण बेपत्ता झाले आहेत. चंबामध्ये 3, कांगडा, सिमला मध्ये 4 जणांचा बळी गेला. यामध्ये 9 वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे.

राज्य सरकारने दोन द‍िवस आगोदच हाय अलर्ट जारी केला होता. मंडी आणि कांगडाच्या दिशेने येणारी वाहने दुसऱ्या दिशेला वळवीण्यात आली आहेत. सिमलामधील माइपुलमध्ये काल युपीमधील एका गाडीवर दरड कोसळली त्यामध्ये तीन जणांचा बळी गेला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर धर्मशाळामध्ये धुवाधार पाऊस कोसळत असून 64 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 24 तासांमध्ये या ठिकाणी 333 मिलीमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे 64 वर्षामधील रेकॉर्ड मोडला. 1958 मध्ये या ठिकाणी 314.9 मिलीमीटर पाऊस पडला होता.

हमीपूरमध्ये 6 ते 7 घरे व्यास नदीच्या पुरामध्ये वाहून गेली. तर 19 जणांना वाचविण्यात यश आले आहे. हिमाचल प्रदेशमधील 742 रस्ते बंद आहेत. वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे. सुमारे 2000 रोहित्र बंद आहेत. तर 172 ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचे पंप बंद ठेवण्यात आले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मंडीमध्ये दरड कोसळल्याने 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले. ह‍िमाचल प्रदेशच्या 12 पैकी 11 जिल्हयांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केवळ लाहौल स्पीतीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Nilesh Rane : निलेश राणे म्हणाले, हात जोडून माफी मागतो

tomato flu : लहान मुलांना टोमॅटो फ्लूची भीती

Virushka Scooter Ride : अनुष्का शर्मा आणि विराटची कोहलीची ‘स्कूटर राईड’ला पसंती

24 ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये 24 तासांमध्ये 346.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर मंडीमध्ये 119.6, डलहौसीमध्ये 111 मिमी, पालमपुरमध्ये 113 मिमी, सुंदरनगरमध्ये 77.7 मिमी, धर्मशाळामध्ये 333 मिमी, बरठीमध्ये 60 मिमी, शिमलामध्ये 57.7 मिमी, कुफरीमध्ये 69 मिमी पावसाची नोंद झाली. मंडीच्या करसोगमध्ये दरडी कोसळल्यामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सुमारे 1,135 कोटींचे नुकसान ढगफुटीमुळे झाले आहे. दरड कोसळून 217 जणांचा बळी गेला असून, शिमलामध्ये 35 जणांचा तर कुल्लूमध्ये 31 जणांना आपले प्राण गमवावे लागले. ह‍िमाचल प्रदेशमधील अनेक नदया धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. लारजी धरण 969 मीटर भरले आहे. नाथपा धरण 1752 मीटर, चांजूएक 1440.10 मीटर भरले आहे. ही सगळी धरणं क्षमतेपेक्षा जास्त भरल्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी