29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयHaribhau Rathod : हरिभाऊ राठोडांनी बदलली पार्टी, थेट 'आम आदमी पार्टी'त प्रवेश

Haribhau Rathod : हरिभाऊ राठोडांनी बदलली पार्टी, थेट ‘आम आदमी पार्टी’त प्रवेश

सत्ता मिळवण्याच्या चढाओढीत अनेकजण हिरीरीने सहभाग नोंदवत थेट पक्षच बदलून दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करीत आहेत. राष्ट्रीय ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा येणाऱ्या काळाची बदलती चक्रे लक्षात घेत आम आदमी पार्टीला जवळ करण्यात धन्यता मानली आहे.

देशभरात राजकारणाने सध्या वेगळेच वळण घेतले आहे. सत्ता मिळवण्याच्या चढाओढीत अनेकजण हिरीरीने सहभाग नोंदवत थेट पक्षच बदलून दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करीत आहेत. राष्ट्रीय ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी सुद्धा येणाऱ्या काळाची बदलती चक्रे लक्षात घेत आम आदमी पार्टीला जवळ करण्यात धन्यता मानली आहे. हरिभाऊ राठोड यांच्यासह रिटायर्ड ए.सी.पी.धनराज वंजारी तसेच यवतमाळचे व्हाईट टायगर अमान भाई यांनी आज दिल्ली येथे आम आदमी पक्षात जाहीर प्रवेश केला. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंगल, मुंबई प्रभारी अंकूश नारंग, मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रिती मेनन, महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे, महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, पुणे ओबीसी मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी, ऑल इंडिया बंजारा संघाचे उत्तर भारताचे अध्यक्ष एस पी सिंग लबाना तसेच हरियाणा प्रदेशचे आम आदमी पार्टीचे नेते मखनसिंग लबाना उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते यांनी सुद्धा जाहीर प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा…

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

Nilesh Rane : निलेश राणे म्हणाले, हात जोडून माफी मागतो

tomato flu : लहान मुलांना टोमॅटो फ्लूची भीती

याप्रसंगी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले, आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वखाली या देशाला नवीन सक्षम पर्याय मिळणार असून नवीन क्रांती घडणार असल्याचा विश्वास सुद्धा राठोड यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील जनता वाढती महागाई, भ्रष्टाचार, सीबीआय, ईडी या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर, प्रस्थापितांच्या फोडा फोडीचे राजकारण या सर्व बाबींना कंटाळली असून सक्षम राजकीय पर्याय म्हणून राज्यातील जनता आम पार्टीकडे बघत असल्याचे मत राठोड यांनी व्यक्त केले. राठोड पुढे म्हणाले,  जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना प्रस्थापित पक्ष मात्र एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात मराठा,ओबीसी, मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षण सारखे विषय मार्गी लावण्यात सरकार असफल ठरले आहे. अशातच आपचे दिल्ली व पंजाब मॉडेल जनतेत चर्चेचा विषय बनत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी