कोकण

Maharashtra Sea : महाराष्ट्राचा समुद्र किनारा सुरक्षित आहे का ?

महाराष्ट्राला विस्तीर्णी असा समुद्र (Maharashtra Sea) किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अनुभवण्याचा अनेकांना मोह होतो. मात्र महाराष्ट्राच्या या समुद्र किनाऱ्यावरची सुरक्षा अनेक वेळा धोक्यात आल्याची उदाहरणे आहेत. नुकतीच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हर‍िहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पदरित्या आढळून आली. त्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक वेळा अनेक समुद्र किनाऱ्यावरून आरडीएक्स तसेच बंदूका आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल किनाऱ्यावर आरडीएक्स उतरवण्यात आले होते. तेच आरडीएक्स मुंबई बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यात आली होती.

आता मिळालेल्या या बोटीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. राज्य सरकारची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, जोरदार तपासणी सुरू आहे.‍ सणांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाकेबंदी सुरू आहे. हर‍िहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट सापडल्यामुळे मुंबईसह रायगड जिल्ह्यात हाय अर्लट देण्यात आला आहे. पोलिसांनी बोट ताब्यात घेतली आहे. या बोटीमध्ये एके 47 च्या 2 रायफली तसेच दारुगोळा आणि कागदपत्रे आढळून आली आहेत. पोलिसांनी ही बोट ताब्यात घेतली आहे.

ही बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही बोट युरोपला जात होती. समुद्रात या बोटीचे इंजिन खराब झाले आहे. कोर‍ियन बोटीने लोकांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. ही बोट नेप्च्युन सिक्युरीटी कंपनीची आहे. समुद्राला तुफान आल्यामुळे ही बोट वाहून किनाऱ्यावर आली असल्याची माहिती समोर आली आहे. या बोटीनंतर श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी एटीएस किंवा स्टेट एजन्सीचे विशेष पथक तैनात करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या घटनेमुळे रायगड, रत्नागिरी, मालवण तसेच मुंबईसह संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

CBI : महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार सीबीआयचा सिलसिला

Manish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

Blood Donation Camp : लग्नघाईत रक्तदानाचा मुहूर्त

रायगड मधील समुद्र किनारे हे संवेदनशिल आहेत. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाच्यावेळी रायगडमधील याच समुद्रकिनाऱ्यावर आरडीएक्स उतरवण्यात आले होते. 26 /11 चा मुंबई दहशवादी हल्ला समुद्रमार्गेच झाला होता. त्यामुळे संशयास्पद बोटीची सुरक्षा यंत्रणांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. 26 नोव्हेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी रात्री 8.10 वाजता एका बोटीतून आठ तरुण कफ परेडला आले होते. त्याच दिवशी 8.20 वाजता अशा प्रकारे दहा व्यक्ती बोटींतून कुलाब्याला आल्या होत्या. ही पार्श्वभूमी विचारात घेता सिमा सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे. आठ दहा वर्षांपूर्वी पालघर जिल्हयातील समुद्र किनारी देखील आरडीएक्स सापडले होते. त्यामुळे सागरी सुरक्षे बाबत सरकाने गाफील राहून चालणार नाही.

रूपाली केळस्कर

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

2 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

3 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

5 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

5 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

6 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

6 hours ago