कोकण

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश; तळीयेतील ६६ दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे

2021 मध्ये कोकणात झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. या पावसात ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासह तळ कोकणात मोठी हानी झाली होती. महाड, तळीये येथील कोंढाळकरवाडी येथे जुलै २०२१ मध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेत बाधित झालेल्या 66 गावकऱ्यांना म्हाडाकडून घरे बांधून दिली जातील असे आश्वासन तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले होते. त्यानुसार ही घरे बांधण्यात आली आहेत. ६६ घरांचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही घरे म्हाडाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केली जातील. त्यानंतर ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

या संदर्भात ‘लय भारी’च्या प्रतिनिधीने तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, ‘ही दुर्घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांच्या डोक्यावर छप्पर नव्हते, त्यामुळे माणुसकीच्या नात्याने ही घरे बांधण्याचे आदेश म्हाडाला दिले होते. आता ही घरे बांधून पूर्ण झाली आणि ती दुर्घटनाग्रस्तना मिळणार आहे याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या दुर्घटनेत ६६ घरे गाडली गेली. तर ८७ जणांचा मृत्यू झाला. ८७ पैकी अंदाजे ५४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधली जातील असे जाहीर केले. प्री फॅब पद्धतीने घरे बांधण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. या पद्धतीने घरांचे काम वेगात होत असल्याने सहा महिन्यात घरे देऊ असेही त्यांनी जाहीर केले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे टी लवकर बांधता आली नाहीत.

दरम्यान सुरुवातीला केवळ ६६ बाधितांसाठीच घरे बांधली जाणार होती. पण पुढे दुर्घटनेचा धोका असलेल्या इतर घरांचा शोध घेत एकूण २६३ घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १४.६४ हेक्टर जागा संपादित करून ती म्हाडाला दिली. या जागेवर २६३ पैकी २०० घरांच्या कामाला सुरुवात झाली. २०० पैकी बाधितांसाठीची ६६ घरे प्राधान्याने पूर्ण करून घरांचा ताबा देण्याचे म्हाडाने जाहीर केले. आतापर्यंत यासाठी अनेक तारखा देण्यात आल्या असून शेवटची तारीख मार्च २०२३ अशी होती. मार्चमध्ये घरे पूर्ण करून ती जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग केली जाणार होती. पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडून घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र मार्चमध्ये घरे बांधून झाली नाहीत. त्यामुळे ६६ जणांची घराची प्रतीक्षा कायम होती.

हे सुद्धा वाचा

भगतसिंग कोश्यारी यांना दानवेंचे शुभेच्छा पत्र; ‘जागतिक गद्दारी दिना’साठी ‘युनो’कडे प्रयत्न करण्याची मागणी

‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

संत निवृत्तीनाथांची पालखी कर्जत शहरात करणार मुक्काम तर मुक्ताबाईंची पालखी आज पारगाव मध्ये विसाव्याला

आता मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण ६६ घरांचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही घरे म्हाडाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केली जातील. त्यानंतर ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल. पुढील आठवड्यात ताबा देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते घरांचा ताबा देण्यात येणार आहे. उशिरा का होइना आता महाडच्या तळीयेतील ६६ दरडग्रस्त गावकऱ्यांना मिळणार हक्काची घरे मिळणार आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

14 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

15 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

15 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

18 hours ago