31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसंत निवृत्तीनाथांची पालखी कर्जत शहरात करणार मुक्काम तर मुक्ताबाईंची पालखी आज पारगाव...

संत निवृत्तीनाथांची पालखी कर्जत शहरात करणार मुक्काम तर मुक्ताबाईंची पालखी आज पारगाव मध्ये विसाव्याला

विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या वारीचा आज 16 वा दिवस. मुखात विठुरायाचे नाम, डोक्यावर तुळशी वृंदावन , टाळ-चिपळ्या आणि मृदुंगाच्या जोडीने भजन किर्तन करत वारकरी एक एक पावले पंढरपूरच्या दिशेने टाकत पुढे जात आहेत. संत निवृत्तीनाथांच्या पालखीने आतापर्यंत 259 किलोमीटरचा टप्पा पार केला असून पालखी नगर जिल्ह्यातील कर्जत शहराजवळ दाखल झाली आहे. काल पालखी मिरजगाव येथे मुक्कामाला होती. मिरजगावातील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी वडगाव मोरगाव येथील मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून आज पारगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.

2 जून रोजी निघालेल्या या पालख्या गेल्या सोळा दिवसांपासून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. राज्यभरातून लाखो भाविक वारीमध्ये सामिल होत असतात. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणी स्वागत करुन दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणाचे वारकरी वारीत सामिल होत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक विविध दिंड्याच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

हे सुध्दा वाचा:

येत्या ३ ते ४ दिवसांत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला, ते तुम्ही पुसणार आहात का; प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल

कोस्टल रोडचे काम 76 टक्के पूर्ण; 13 हजार कोटींच्या घरात खर्च,नोव्हेंबर 2023 पर्यंत काम होणार पूर्ण

बीड येथून पायी मार्गाने निघालेली संत मुक्ताबाईंच्या पालखीचा आज सोळावा दिवस आहे. आत्तापर्यंत पालखीने 308 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तर आज पालखी रौळसगाव, धोत्रा, चौसाळामार्गे पारगावला मुक्कामाला जाणार आहे. आज दुपारी चौसाळा गावातील ग्रामस्थांकडून पालखीसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणानंतर पालखी पारगावला मार्गस्थ होणार आहे. तर निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर आहे पुढे मार्गक्रमण करत पालखी डिकसळ, चिंचोली, काळदाते, भैरोबाची वाडीमार्गे पालखी कर्जत शहरात मुक्कामाला असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी