34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन'आदिपुरुष'चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांची मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

‘आदिपुरुष’ चित्रपटावर सध्या देशभरातून मोठी टीका होत आहे. चित्रपटातील सीन, व्हिएफएक्स आणि चित्रपटातील संवादावरुन प्रेक्षक प्रचंड नाराज आहेत. चित्रपटातील संवाद आक्षेपार्ह असल्याने संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना धमक्या येत असल्याने मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी मनोज मुंतशीर यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले असून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

या चित्रपटातील संवादावरुन तसेच चित्रपटातील राम, सिता, हनुमान या पात्रांच्या चित्रणावरुन देखील अनेक सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. करणी सेनेने मध्यप्रदेशात एका पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना धमकावले आहे.

या चित्रपटामध्ये संवाद देवदेवतांच्या तोंडी शोभणारे नाहीत, ते अंत्यंत खालच्या पातळीवरचे असल्याची टीका चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांकडून होत आहे. समाज माध्यंमांवर चित्रपाटाच्या संवादावरुन दिग्दर्शक आणि संवाद लेखकांवर आक्षेप घेतले जात आहेत. तसेच अनेक मीम्स देखील बनवले आहेत.

दरम्यान चित्रपटाचे संवाद लेखक मुंतशीर यांनी रविवारी ट्विटरवरुन एक पोस्ट करत चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचे जाहिर केले आहे.

हे सुद्धा वाचा

संत निवृत्तीनाथांची पालखी कर्जत शहरात करणार मुक्काम तर मुक्ताबाईंची पालखी आज पारगाव मध्ये विसाव्याला

येत्या ३ ते ४ दिवसांत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता

औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला, ते तुम्ही पुसणार आहात का; प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट 16 जून रोजी देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गेले मात्र चित्रपटातील संवादामुळे, व्हिएफएक्समुळे अनेकांची निराशा झाली. अनेक संघटना, राजकीय पक्षाचे नेते, सर्वसामान्य लोकांनी देखील समाजमाध्यमांवर या चित्रपटावर आक्षेप घेतला. रावण, हनुमान, बिभिषणाची पत्नी यांचे जे चित्रपटातील चित्रण आहे, त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी