कोकण

दापोली हर्णे मार्गावर ट्रक व मॅजिक रिक्षाचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दापोली हर्णे मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दापोली हर्णे मार्गावरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी डमडम व दापोलीकडे येणार ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे.

समोरुन येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरुन टर्न मारला. तेव्हा मॅजिक प्रवासी रिक्षा जोरदार ट्रकवर आदळली. ट्रकने प्रवासी रिक्षाला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले. हा अपघात इतका भीषण घडला की, रिक्षामधील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अडखळ, हर्णे, पाजपंढरी तसेच दापोलीकरांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघात स्थळावरुन पळ काढला. दापोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हे सुध्दा वाचा:

पावसाच्या आगमानाने बळीराजा सुखावला, कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकरी सरसावला

ठाण्यातील अर्ध्या डझन प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण….

मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान

अपघातात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातात प्रवासी मॅजिक गाडीचे चालक अनिल सांरग यांचा मृत्यू झाला आहे. ते हर्णे गावचे रहिवासी होते. या अपघातात ट्रक चालकाची चूकी होती, असा अंदाज लावण्यात आला आहे. अपघातास्थळी स्थानिकांसह येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती.

रसिका येरम

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago