31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान

मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल गावाच्या विकासात अडसर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सैनिकी शाळा, मूलचे बस स्थानक, एसएनडीटी विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, बांबू प्रशिक्षण केंद्र, सार्वजनिक वाचनालय अशा विविध माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख बदलत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव पोहोचले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराला व नव्या संसद भवनाला लावण्यात आलेले काष्ठ चंद्रपुरातील असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत आहे. श्री. मुनगंटीवार म्हणाले की विकासाचा हाच धडाका कायम ठेवायचा आहे. सर्वांची साथ असली तर विकास अधिक वेगाने शक्य होईल असे ना.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील सुभाष प्राथमिक शाळेत आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मुलच्या विकासात अडसर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आपण हे सर्व प्रयत्न हाणुन पाडले आहे. सत्तेत असो अथवा नसो मुलचा विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार आहे. देशात काही पक्ष जातीधर्माच्या नावावर विष पेरण्याचे काम करीत आहेत. हिंदू-मुस्लिम असा भेद करू पहात आहेत. अफजल खानला एका विशिष्ट धर्माचा असल्यामुळे कुणाचाही विरोध नसून त्या प्रवृत्तीला विरोध आहे.

हे सुध्दा वाचा:

कंगना रनौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत, चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित

शासकीय महापुजेवेळी विठुरायचे मुखदर्शन राहणार सुरू

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामान्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वाचा कधी व कुठे खेळले जाणार सामने

देशात विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्याचे काम करीत आहेत. मात्र काही शक्ती आणि काँग्रेस पक्षाकडून मोदीजी यांचा विरोध सातत्याने करीत आहेत. अशा शक्तींना आणि पक्षांना आता जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी