31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयठाण्यातील अर्ध्या डझन प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण

ठाण्यातील अर्ध्या डझन प्रकल्पाचे रविवारी मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे शहरातील राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून झाला आहे. 25 जून रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात श्री. कपिल पाटील, राज्यमंत्री, पंचायत राज मंत्रालय हे प्रमुख अतिथी म्हणून तर श्री. शंभूराजे देसाई, पालकमंत्री ठाणे, श्री. रवींद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम,अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, प्रमोद पाटील, डॉ. जितेंद्र आव्हाड, ॲङ निरंजन डावखरे उपस्थित राहणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे. सकाळी 10 वाजता पोखरण रोड नं. 2 येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व.बाबुराव मारुतीराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर व महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 11 वाजता मुख्य सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास ठाणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केले आहे.

हे सुध्दा वाचा:

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण; संत एकनाथ महाराजांची पालखी सोलपूरात

मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे आव्हान

शासकीय महापुजेवेळी विठुरायचे मुखदर्शन राहणार सुरू

पोखरण रोड नं. 2 येथील कै.सिंधूताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, कासारवडवली, घोडबंदर रोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, ठाणे महापालिकेकडील सुविधा भूखंडावरील आदिवासी विद्यार्थी वसतीगृह व शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजीटल ॲक्वेरियम या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी