कोकण

टी टाईम : 50 नॉट आऊट !

टी टाईम : 50 नॉट आऊट ! ही आहे सचिन तेंडुलकरची आयडियाची कल्पना – 50 वा वाढदिवस साजरा करण्याची. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर सचिन तेंडुलकर वाढदिवसाला पोहोचला आहे कोकणात. तो सिंधुदुर्गात समुद्रकिनारी निवांतपणे बाल्कनीत बसून घेतोय चहाचे घोट घेत आहे. तसे फोटो त्याने ट्विट केले आहेत.

सचिन तेंडुलकर (फोटो सौजन्य : @sachin_rt)
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरवर वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राच्या मातीत आपलं क्रिकेट घडवून, आपल्या खेळाने, आपल्या तपश्चर्येने जगभरातील लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवत देवत्व प्राप्त करणाऱ्या शतकांतून एकदाच जन्मास येणाऱ्या शतकवीरास, क्रिकेटच्या देवास वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा! अशा शब्दांत आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतरत्न मिळूनही आरे तुरे करावं इतका जवळचा आहेस, क्रिकेटचा देव असलास तरी! सोळाव्या वर्षांत वकार सारख्या तोफेला तोंड देणारं रुप लक्षात ठेवू कि शारजात वाळूच्या वादळानंतरचं वार्नला घाबरवणारं तुझं वादळी रुप? वेड लावलंस आमच्या पिढीला!! असं एका चाहत्याने म्हटले आहे.

कोकणातील भोगवे येथील अलिशान रिसॉर्टमध्ये सचिनचे बर्थडे सेलिब्रेशन

“समज! एकाग्रता! धैर्य! मेहनत! सातत्य व जिद्धी ने,आपली खेळी “यशस्वी” करणाऱ्या.. लाडक्या सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”❤💐🎂👍 असे आणखी एका युझरने लिहिले आहे.

क्रिकेट विश्वातला अढळ ध्रुवतारा, विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न श्री. सचिन तेंडूलकर यांना 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे एकाने म्हटले आहे.

 

हे सुद्धा वाचा : 

Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 50 नाबाद!

कौतुकास्पद : वानखेडेत होणार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा..!

मास्टर ब्लास्टर सचिनच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

फोटो क्रेडिट @sachin_rt

आयुष्याच्या या खेळीमध्येही तुमच्या क्रिकेटला साजेशी शतकोत्तर खेळी आम्हाला पहावयास मिळो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सचिन सर… अशा हजारो संदेशांचा महापूर सचिनसाठी दिसून येत आहे.

Sachin Tendulkar BirthDay, Tea Time, 50 Not Out, Bhogve Sindhudurg, Sachin BirthDay

 

विक्रांत पाटील

Recent Posts

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

1 hour ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

2 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

2 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

2 hours ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

3 hours ago

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…

4 hours ago