महाराष्ट्र

महादेव जानकर भाजपसोबतचा संसार मोडण्याच्या तयारीत

टीम लय भारी

मुंबई :- बारामतीत संदीप चोपडे यांच्या कार्यालयात काल पत्रकारांशी आमदार महादेव जानकर यांनी संवाद साधला. महादेव जानकर म्हणाले की, मी सध्या तरी भारतीय जनता पक्षाबरोबरच आहे, त्यामुळे आतातरी माझा महाविकास आघाडीकडे कल नाही. परंतु, भविष्यात जर काही गोष्टी वेगळ्या घडल्या, तर सगळेच पर्याय आमच्यासमोर खुले आहेत, असे सूचक वक्तव्य करून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी “भारतीय जनता पक्षालादेखील मी माझे उपद्रवमूल्य दाखवून देणार आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला. ज्ञानेश्वर सलगर, माणिकराव दांगडे, ऍड. अमोल सातकर, किरण गोफणे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

महादेव जानकर म्हणतात की, मी एका पक्षाचा प्रमुख असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, कॉंग्रेस या सर्वच पक्षांच्या प्रमुखांसोबत माझे मैत्रीचे संबंध असल्याचे सांगण्यासही जानकर विसरले नाहीत. राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणुकीत लक्ष केंद्रीत करणार असून किमान वीस आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने संघटना बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे, असे जानकर यांनी सांगितले.

आमदार महादेव जानकर म्हणाले, “परभणी, जालना, हिंगोली, माढा, बारामती यासह पाच मतदारसंघावर मी लक्ष केंद्रीत करणार आहे. या मतदारसंघातील किमान वीस विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची आमदारांची संख्या वाढली, तर राज्याच्या सत्ताकारणात आमच्याशिवाय सरकारच बनणार नाही, अशी स्थिती निर्माण होईल.” दरम्यान, मी सध्या आमदार असलो तरी २०२४ च्या निवडणुकीत मी परभणी, माढा किंवा बारामती यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचेही माजी मंत्री जानकर यांनी स्पष्ट केले.

धनगर समाज बांधवाना आदिवासीच्या २२ योजनांच्या सवलती मिळाव्यात, यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अध्यादेश काढण्यात आला होता. त्या योजनांसाठी एक हजार कोटींची तरतूदही केली होती. परंतु, त्याच वेळेस आचारसंहिता लागली आणि सरकार गेले. दुर्देवाने महाविकास आघाडीच्या सरकारनेही तरतूद केलेली नव्हती. पण, मी सभागृहात मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शंभर कोटींची तरतूद यासाठी केली. या सवलती मिळण्यासाठी राजकीय दबाव तयार करावा लागेल, असे ही जानकर म्हणाले. विद्यमान सरकारवर मला टीका करायची नाही; पण त्यांनी तरतूद करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Rasika Jadhav

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

12 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

13 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

16 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

17 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

18 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

18 hours ago