33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रममता बॅनर्जींचे थेट पक्षप्रमुखांना पत्र; बंगालमध्ये राजकीय घडामोडी तापल्या

ममता बॅनर्जींचे थेट पक्षप्रमुखांना पत्र; बंगालमध्ये राजकीय घडामोडी तापल्या

टीम लय भारी

मुंबई :-  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ चा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आव्हान केले आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्रे लिहून हे आवाहन केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे एमके स्टॅलिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जनग रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.

राज्यपालांच्या आडून कोंडी

यावेळी ममता बॅनर्जी यांनी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया (दुरुस्ती) विधेयकाचाही उल्लेख केला आहे. हे विधेयक संघ व्यवस्थेच्या विरोधात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे. भाजप हे केवळ दिल्लीच्याबाबत करत नाही. तर संपूर्ण देशात हाच प्रकार सुरू आहे. गैर भाजपाशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून समस्या निर्माण केल्या जात आहेत, असे सांगतानाच नियोजन आयोगाचे नाव नीती आयोग ठेवल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

विधानसभेनंतर एकत्र या

भाजप सरकारने सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षांच्या विरोधात वापर सुरू केला आहे. मोदी सरकारच्या आदेशामुळेच ईडीने केवळ टीएमसी नव्हे तर डीएमकेसहीत अन्य पक्षांच्या नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे, असे सांगतानाच आता लोकशाही आणि संविधानावरील भाजपचे आक्रमण परतवून लावण्यासाटी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. सर्व समानविचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्रे यावे. विधानसभा निडवणुकीनंतर याबाबत एक ठोस योजना बनविण्याची गरज आहे, असे ही ममता दीदींनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी