31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोना साथ : चीनमधून 324 भारतीय विशेष विमानाने दिल्लीत दाखल

कोरोना साथ : चीनमधून 324 भारतीय विशेष विमानाने दिल्लीत दाखल

लयभारी टीम

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात थैमान घातला आहे. याचा फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी 324 भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज (1 फेब्रुवारी) भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.

एअर इंडियाने वुहानमध्ये फसलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आज पहिल्या विमान फेरीत 324 भारतीय मायदेशी परतले. या डबल डेकर जम्बो 747 विमानात 15 केबिन क्रू आणि 5 कॉकपिट क्रू सदस्य देखील होते. त्यांच्यामदतीने चीनमधील भारतीयांना पूर्ण देखरेखीखाली भारतात आणण्यात आलं.

क्रू व्यतिरिक्त विमानात प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन काळजी घेण्यासाठी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील 5 डॉक्टरांचं पथकही होतं. त्यांच्यासोबत एअर इंडियाच्या पॅरामेडिकल स्टाफचा एक सदस्यही सहभागी होता.

दरम्यान, आतापर्यंत कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीनमध्ये 213 लोकांचा जीव घेतला आहे. तसेच जवळपास 10 हजार लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस भारत, संयुक्त अरब अमीरात, श्रीलंका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तिबेटसह अनेक देशांमध्ये पोहचला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आणीबाणीच्या स्थितीची घोषणा केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी