महाराष्ट्र

शिवसेना, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार; कॉंग्रेस सतरंज्या उचलणार; मनसेचा टोला

टीम लय भारी 

मुंबई: खासदार  सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह तुळजापूरच्या तुळजा भवानीचे दर्शन घेतले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री होऊ दे. संपूर्ण पक्ष घेऊन तुळजा भवानी मातेच्या दर्शनाला येईन, असा नवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंबाबाईच्या चरणी केला.

यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. या सगळ्यावर मनसे (MNS) नेते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी सरकारावर जोरादर टीका केली आहे. त्यांनी ट्विट कर असे म्हटले की,

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय. गजानन किर्तीकर,खासदार संजय जाधव,श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत. लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत #लाचारसेना

पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार – विश्वप्रवक्ते संजय राऊत पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार- सुप्रिया सुळे मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ???

मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला लाचारसेना म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसनेचे खासदार संजय राऊतांवर ही निशाना साधला आहे.

हे सुद्धा वाचा: 

जे लोक द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवींचा विचारच कळला नाही : रोहित पवार

Union Minister’s Mumbai House Gets Show Cause Notice Over Coast Norms Violation

Shweta Chande

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

5 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

6 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

6 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

6 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

12 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

13 hours ago