महाराष्ट्र

जे लोक द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवींचा विचारच कळला नाही : रोहित पवार

रोहित पवार यांनी उत्तर दिले की, जे लोक द्वेषाने बोलतात, जे लोक खालच्या पातळीला जाऊन बोलतात त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारच समजलेला नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी  दिली आहे.

टीम लय भारी

जे लोक द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवींचा विचारच कळला नाही : रोहित पवार

कर्जत-जामखेड : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी येथे साजरी करण्यात येत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी चौंडी येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप नेते राम शिंदे यांनी टीका केली होती. यावर रोहित पवार (Rohit pawar) यांनी उत्तर दिले की, जे लोक द्वेषाने बोलतात, जे लोक खालच्या पातळीला जाऊन बोलतात त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारच समजलेला नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी  दिली आहे. Rohit pawar warns on ahilyabai holkar birth anniversary

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी हा काही राजकीय कार्यक्रम नाही असे म्हटले आहे. आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसाठी नाही तर भारतासाठी महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशातून लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस अभिवाद करण्यासाठी येतात. आजच्या दिवशी मला काही राजकीय बोलायचे नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. जे बोलतात त्यांना बोलू द्या.

जे लोक द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवींचा विचारच कळला नाही : रोहित पवार

हे सुद्धा वाचा: 

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे : हेमंत पाटील

Aryan Khan Case: Officer Blamed For “Shoddy” Probe Transferred To Chennai

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close