33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना खासदारांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं स्वतःचं घर

शिवसेना खासदारांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं स्वतःचं घर

लयभारी टीम

कोल्हापूर : कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. परंतु शिवसेना खासदाराच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतूक सुरु झालं आहे. होम क्वारंटाईनसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वतःचं घर दिलं आहे. त्यामुळे खासदार माने हे स्वत:च घर देणारे एकमेव खासदार बनले आहेत.

धैर्यशील माने यांनी कोल्हापुरातल्या रुकडी येथील आपले घर त्यांनी होम क्वारंटाईनसाठी दिलं आहे. होम क्वारंटाइनसाठी स्वतःचं घर देणारे धैर्यशील माने हे देशातील पहिले खासदार आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं होतं. एखादा व्यक्ती परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याला संबंधित ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते. मात्र त्यांचा निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना आता त्यांच्या घरी जायची सोय केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या व्यक्तीची घरीच सोय करण्यात येणार आहे. मात्र घरातील सदस्यांनी मात्र आपल्या भावकीत किंवा शेजाऱ्यांच्यात काही दिवस राहण्यासाठी जावे, असे आवाहन केले होते. आवाहन केल्यानंतर त्यांनी सुरुवात स्वतःपासूनच केली आहे.

ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामाला मदत होणार…

ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामाला मदत होणार असून कुटुंबाला आणि पर्यायाने गावाला सुद्धा कोणताच धोका होणार नाही, अशा पद्धतीमुळे अलगीकरणाचे नियमांचं तंतोतंत पालण होण्यास सहकार्य करावं. शिवाय सामाजिक एकोपा आणि एकमेकांमधील नाती आणखी दृढ होतील, असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी