33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका

टीम लय भारी

संगमेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उद्धव ठाकरें कडून झटका मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली दिली पाहिजे अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राणेंच्या विरूद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता (Narayan Rane has finally been arrested by the police).

नारायण राणेंना पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून अटक केली आहे. राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु मुंबई हायकोर्टाने तातडीने या प्रकरणावर सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे राणे यांना अटक झाली आहे.

कोरोना हृदय सम्राट गप्प का, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

नाक कापणे, गोळ्या झाडणे, दगडाने ठेचणे… वाचा तालिबान्यांची क्रूर कहाणी

Narayan Rane
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली दिली पाहिजे अशा शब्दात नारायण राणेंनी टीका केली होती.

नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी ते कोकणचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला होता. एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

‘नरेंद्र मोदींकडे भीक मागत नाही’

‘Slap Uddhav’ row live updates: Police arrests Narayan Rane; BJP supporters gather outside Sangameswar police station in Ratnagiri

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ , अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी