महाराष्ट्र

Nashik Bribe Case : आदिवासी विभागातील अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार, शौचालयात घेतली लाच!

नाशिक शहरातील कळवणच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याने लाच स्विकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेआधी त्याच आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम विभागातील अभियंत्याने सुद्धा 28 लाखांची लाच घेतल्याचे प्रकरण नुकतेच घडले असताना सुद्दा पुन्हा त्याच विभागात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कळवण सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याचे नाव प्रताप वडजे असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यांत लाच प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे, चारच दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी लाच स्विकारल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणांनंतर कोणी गंभीरपणे याची दखल घेणार का हे पाहणे निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, कळवण आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या एका शासकीय आश्रम शाळेतील एक महिला सफाई कर्मचारीला स्वयंपाकी पदावर नियुक्ती देण्यासाठी प्रताप वडजे यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली. महिला गरजू असल्याने कशीबशी सोय करून करून 10 हजार रुपयांची सोय केली आणि वडजे यांनी तडजोड करून ती रक्कम स्विकारली. याआधी त्याच विभागातील एका कर्मचाऱ्याने 28 लाखांची लाच स्विकारली होती. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा बसण्याऐवजी या घटनांमध्ये वाढच होत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे प्रशासनासमोर अडचणी वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा…

Mumbai Railway Bridge : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने धोकायदायक पुलांबाबत मुंबईकरांना केले आवाहन

Mantralaya : ‘मंत्रालयात रक्कमा घेतल्या जातात, म्हणून बार्टीचा कारभार वाईट’

दरम्यान, एकामागोमाग एक लाचेची प्रकरणे बाहेर आल्यामुळे नाशकातील क‌ळ‌वण आदिवासी विभाग आता चांगलाच चर्चेत आला आहे, त्यामुळे या विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत हे या प्रकरणानंतर आणखीच स्पष्ट झाले आहे. याबाबत नागरिकांना विचारले असता येथील वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत. ऐकून घ्यायचे झाल्यास पैशांची विचारणा होते असा नाराजीचा सूर त्यांच्याकडून ऐकायला मिळतो.

नाशिकमध्ये सातत्याने भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस येऊ लागले आहे. अगदी चारच दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी लात स्विकारल्याचे वृत्त समोर आले होते, त्यानंतर आदिवासी विकास विभागात बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत असणारे दिनेशकुमार बागुल यांनी 28 लाखांची लाच घेतल्याचे समोर आले, त्यांना या प्रकरणी अटक सुद्धा झाली. त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी सीबीआयच्या एसीबी पथकाने कारवाईचा बडगा उगारत एका उच्च पदस्थ जीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर आता कळवणच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे.

नाशिकमध्ये बोकाळलेल्या या भ्रष्टाचार प्रकरणाला कधी चाप बसणार असा सवालच आता जनसामान्यांमधून विचारण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणी प्रशासनाचा चांगलाच कस लागणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…

35 mins ago

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सातपूर पोलिसांचा “युवा संवाद”

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद (Yuva Sanvad) अभियान…

48 mins ago

तुम्ही फोन घेतला नाही,माझ्या आईचा मृत्यू झाला; मिठू जाधव यांनी सुजय विखे यांना भर सभेत सुनावले

भाजपाचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील…

1 hour ago

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

13 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

14 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

14 hours ago