31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगुड न्यूज:नाशिकमधील कुंभमेळासाठी ३२३ एकर जागा वाढणार

गुड न्यूज:नाशिकमधील कुंभमेळासाठी ३२३ एकर जागा वाढणार

२०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या < Kumbh Mela > नियोजनाची तयारी प्रशासकीय पातळीवर मागील काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असली तरी मनपाकडून त्यापूर्वीच विविध प्रस्ताव शासनाकडे रवाना करण्यात आले असून त्यात सिंहस्थात साधूग्रामसाठी महापालिकेने ५०० एकरचे नियोजन केले आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या सिंहस्थापेक्षा यंदा २२३ एकर जागा अधिक प्रस्तावित करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी ३२३ एकर जागा संपादित करण्यात आली होती. २००३-०४ च्या साधूग्रामसाठी त्यावेळी १०५ एकर जागेचे नियोजन करण्यात आले होते. सिंहस्थात देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांसाठी साधूग्राम उभारले जाते. साधूग्रामसाठी तपोवनात तीनशे एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे.(Good news: 323 acres of land to be increased for Kumbh Mela in Nashik)

मागील सिंहस्थ कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून ५४ एकर जागा संपादित करण्यात आली होती. २०२७-२८ च्या सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नुकताच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ११ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर केला. त्यात हा ५०० एकरचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी नाशिक येथे वातानुकूलित बसस्थानकाच्या लोकार्पणासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला नाशिक व त्र्यंबकेश्वर

फारुक पठाण

सिंहस्थासाठीचा आराखडा लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले होते. जेणे करून येत्या म्हणजेच २०२४ च्या आर्थिक वर्षातच निधीला मंजुरी देण्याचे फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेने धावपळ करून नुकताच आचारसंहितेपूर्वीच हा आराखडा पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सादर केला आहे.

संख्या वाढणार

आगामी कुंभमेळ्यासाठी सुमारे पाच लाख साधू येण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करण्यात येत आहे. गेल्या २०१५-१६ च्या सिंहस्थात तीन लाख साधू आले होते, त्या दृष्टिने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. २००३-०४ च्या सिंहस्थात एक लाख साधू-महंत विविध पर्वण्यांसाठी आले होते.

केंद्राला साकडे

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कुंभमेळ्यातील साधूग्रामसाठी कायमस्वरूपी पाचशे एकर जागा खरेदी करावी तसेच गोदावरी स्वच्छता, सिंहस्थ परिक्रमा मार्ग व वंशावळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा मागणीचे साकडे नाशिक येथे विविध कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांना गंगागोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने घालण्यात आले होते. अशा मागणीचे साकडे नाशिक येथे विविध कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांना गंगागोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने घालण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी